Ajit Pawar: अजितदादांच्या मिश्लील टोलेबाजीने बारामतीकर ‘लोटपोट’

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2023 09:13 PM2023-03-27T21:13:52+5:302023-03-27T21:14:09+5:30

पदाधिका-यांनी लोकांशी व्यवस्थित बोलावे या पवारांच्या मिश्कील टिपणीने बारामतीकरांची हसून दाद

ajit pawar speech in baramati related to adhiveshan | Ajit Pawar: अजितदादांच्या मिश्लील टोलेबाजीने बारामतीकर ‘लोटपोट’

Ajit Pawar: अजितदादांच्या मिश्लील टोलेबाजीने बारामतीकर ‘लोटपोट’

googlenewsNext

बारामती : विरोधी पक्षनेते अजित पवार त्यांच्या रोखठोक भाषणासाठी ओळखले जातात. मात्र,त्याचवेळी त्यांचा मिश्कील स्वभावाने सभांमध्ये निर्माण झालेले विनोद देखील सर्वांनाच भावतात. बारामतीकर देखील त्याला अपवाद नाहीत. सोमवारी(दि २७) आठवड्याच्या पहिल्याच दिवशी बारामतीकरांनी ‘लोटपोट’ करणारे भाषण अनुभवले.

अजित पवारांनी बारामती तालूक्यातील रस्त्यांची माहिती सांगताना नियम सांगितले. मात्र,एका बारामतीकराने रस्त्याशी संबंधित समस्या सांगण्याचा प्रयत्न केला. त्यावर पवार यांनी विधानसभेतील भाषणाप्रमाणे त्याला समजावुन सांगताना सभेतील भाषणा दरम्यान अचानकच अध्यक्ष महोदय,असे संबोधले. त्यानंतर  राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एकच हशा पिकला. पवार यांच्या देखील हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनाही बराच काळ हसू आवरले नाही. मात्र,बराच वेळ हास्याचे फवारे सुरुच राहिले.

पदाधिका-यांनी लोकांशी व्यवस्थित बोलावे, नीट वागावे, माझ्यासारखे वागायची गरज नाही, या पवारांच्या मिश्कील टिपणीने बारामतीकरांनी हसून दाद दिली.   बूथ कमिटी कार्यकर्त्यांनी २५ कुटुंबासोबत घरोघरी संपर्क ठेवा, संपर्क साधताना दुसराच संपर्क साधू नका, व्हॉटसअँपवर मेसेज पाठवू नका, माझ्याकडे जर अशा तक्रारी आल्या तर मी सोडणार नाही, आणि अशा कृत्याने पक्षाचा फायदा होण्याऐवजी तोटाच होईल, असा टोला लगावला.

निवडणूकीच्या काळात विरोधी गटात जायच नाही, अशी तंबीच अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना दिली नाही. काहीजण सहज गेलो होतो,असे सांगतील. पण सहज गेलो सुध्दा चालणार नाही. तुम्ही सहज गेला तर कटु कारवाई करण्याची वेळ माझ्यावर आणु नका, असे  पवार यांनी सुनावले.

...या सुचनेचे पालन करण्यात येईल

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी निवडणुकीच्या बँकेत विरोधी गटाला मतदान करणाऱ्यांचा यंदा उमेदवारी देताना विचार करु नये, अशी मागणी एका अज्ञात चिठ्ठीद्वारे अजित पवार यांच्याकडे भर सभेत करण्यात आली. त्याची भर सभेत माहिती देत अज्ञात चिठ्ठी पाठविणाऱ्याला पवार यांनी धन्यवाद दिले.तुमच्या या सुचनेचे पालन करण्यात येईल,असा शब्द देखील अजित पवार यांनी सभेतच दिला.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे कौतुक...

मागील काही दिवसांपुर्वी बारामती येथे पार पडलेल्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यक्रमात   वेळेअभावी बोलता आले नाहि. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना मी ब-याय गोष्टी सांगितल्या.ते कामांबाबत अत्यंत सकारात्मक असतात, अशा शब्दात अजित पवार यांनी गडकरींचे कौतुक केले.

Web Title: ajit pawar speech in baramati related to adhiveshan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.