संजय काकडेंची विश्वासार्हता पुणेकरांना विचारा, मुख्यमंत्र्याबाबतच्या विधानावरुन अजित पवारांचा खोचक टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2021 03:31 PM2021-05-07T15:31:59+5:302021-05-07T15:32:30+5:30

Ajit Pawar On Sanjay Kakde: राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची महाविकास आघाडीत घुसमट होतेय, ते आज ना उद्या नक्कीच आघाडीतून बाहेर पडतील, असं विधान भाजपचे माजी खासदार आणि प्रदेश उपाध्यक्ष संजय काकडे यांनी केलं होतं.

ajit pawar slams sanjay kakade statement over cm uddhav thackeray | संजय काकडेंची विश्वासार्हता पुणेकरांना विचारा, मुख्यमंत्र्याबाबतच्या विधानावरुन अजित पवारांचा खोचक टोला

संजय काकडेंची विश्वासार्हता पुणेकरांना विचारा, मुख्यमंत्र्याबाबतच्या विधानावरुन अजित पवारांचा खोचक टोला

googlenewsNext

Ajit Pawar On Sanjay Kakde: राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची महाविकास आघाडीत घुसमट होतेय, ते आज ना उद्या नक्कीच आघाडीतून बाहेर पडतील, असं विधान भाजपचे माजी खासदार आणि प्रदेश उपाध्यक्ष संजय काकडे यांनी केलं होतं. त्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काकडे यांना जोरदार टोला लगावला आहे. "मीही आता पुण्यात आहे. संजय काकडे देखील पुण्याचे आहेत. त्यांची विश्वासार्हता तुम्ही पुणेकरांनाच विचारा", असं खोचक टोला अजित पवार यांनी लगावला आहे. (ajit pawar slams sanjay kakade statement over cm uddhav thackeray)

भारतात गरज असताना लस निर्यात का केली, केंद्राचा निर्णय चुकला; अजित पवारांचा घणाघात

अजित पवार यांनी आज पुण्यात कोरोना आढावा बैठक घेतली. त्यानंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी पुण्यातील कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची आणि लसीकरणासंदर्भातील सविस्तर माहिती दिली. यावेळी संजय काकडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेल्या विधानाची माहिती अजित पवार यांना देण्यात आली. त्यावेळी अजित पवार यांनी संजय काकडे यांच्या विधानाला फारसं महत्वं देण्याची गरज नसल्याचं म्हटलं आणि संजय काकडेंची विश्वासार्हता पुणेकरांनाच विचारा, असा टोला हाणला. 

पुण्यातील लॉकडाऊनचा निर्णय मुख्यमंत्र्यांकडे?
राज्य सरकारने पुणे शहरासंदर्भात कोरोना रूग्णांची आकडेवारी सादर केली होती.त्यावर आक्षेप नोंदवत न्यायालयाने पुण्यात कडक लॉकडाऊन लावावा अशा सूचना राज्य सरकारला केल्या होत्या. मात्र यावर राज्य सरकारने पुणे शहराची चुकीची आकडेवारी सादर केली असा आरोप करत पुण्याच्या महापौरांनी केला होता. तसेच आम्ही न्यायालयात दाद मागणार आहोत या असेही ते म्हणाले होते. आता राज्याचे उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी महापौरांनी तातडीने कोर्टात जावे असे सांगितले. तसेच पुण्याच्या लॉकडाऊनबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील अशी भूमिका जाहीर करत लॉकडाऊनचा चेंडू थेट मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात भिरकावला आहे. 

Read in English

Web Title: ajit pawar slams sanjay kakade statement over cm uddhav thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.