शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

"अजित पवारांनी लक्षात ठेवावं, आम्ही त्यांचे बाप आहोत"; चंद्रकांत पाटलांनी साधला निशाणा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2020 19:22 IST

महापालिकेच्या सत्तेच्या बाबतीत जर अजित पवार यांना काही स्वप्नं पडत आहे. मात्र त्यांनी ती पाहण्यात आपली ऊर्जा व्यर्थ घालवू नये.

पुणे: उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना जर पुणे महापालिकेच्या सत्तेविषयी काही स्वप्नं पडत असतील तर त्यांनी ही स्वप्न पाहण्यात जास्त जास्त ऊर्जा वायाला घालवू नये. कारण त्यांनी एक गोष्ट आवर्जून लक्षात ठेवावी ती म्हणजे आम्ही पण त्यांचे बाप आहोत. अशा शब्दात भाजपचे प्रदेशाध्यक्ष व कोथरूड मतदार संघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. 

पुण्यात एका कार्यक्रमात चंद्रकांत पाटील यांनी भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. त्यावेळी ते बोलत होते. पाटील म्हणाले, “पुणे महानगरपालिकेच्या प्रभाग समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत १५ पैकी ११ ठिकाणी भाजपाने अध्यक्षपद मिळवत वर्चस्व मिळवले आहे. आणि एक जागेवर काँग्रेसकडे गेली आहे. अन्य ३ जागा राष्ट्रवादी काँग्रेसने जिंकल्या आहेत. मात्र प्रभाग समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत काहीतरी जादू करून सर्वच जागांवर भाजपाचे अध्यक्ष व्हायला हवे होते.. मात्र, तसे घडले नाही. परंतु, महापालिकेच्या सत्तेच्या बाबतीत जर अजित पवार यांना काही स्वप्नं पडत आहे. मात्र त्यांनी ती पाहण्यात आपली ऊर्जा व्यर्थ घालवू नये. कारण आम्ही देखील तुमचे बाप आहोत. 

भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देताना ते म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी असे नेते आहेत ज्यांना सन २०१४च्या लोकसभा निवडणुकीत २८२ आणि सन २०२०च्या निवडणुकीत ३०३ खासदार आपले मिळाले आहेत. भाजपाला मदत करणारे सहयोगी खासदार सध्या १०३ वरुन १५३ आहेत. इतक्या मोठ्या संख्याबळ असलेल्या पक्षाचे आपण कार्यकर्ते आहोत याचा प्रत्येकाने अभिमान बाळगायला हवा. 

रोहित पवारांबाबत चंद्रकांत पाटील काय म्हणाले... 

मोठ्या व्यक्तींवर टीका केल्याशिवाय काही जणांना प्रसिद्धीच मिळत नाही. अशा व्यक्तींना प्रसार माध्यमांनी समजून सांगायला हवे की, टीका केल्याखेरीज देखील आम्ही तुम्हाला कव्हरेज देऊ.  मग ते कदाचित टीका करणे बंद करतील अशा शब्दात भाजपचे प्रदेशाध्यक्ष व कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांना नामोल्लेख न करता सणसणीत टोला लगावला. 

 पुण्यात भाजपच्या एका कार्यक्रमाला चंद्रकांत पाटील हे उपस्थित होते. त्यावेळी ते बोलत होते. रोहित पवार हे नेहमी पंतप्रधान नरेंद्र मोदी, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या मोठ्या व्यक्तींवर विविध मुद्दे उपस्थित करून टीका करताना दिसतात. त्याचाच संदर्भ घेत पाटील यांनी रोहित पवारांना लक्ष केले. 

टॅग्स :Puneपुणेchandrakant patilचंद्रकांत पाटीलAjit Pawarअजित पवारPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाPoliticsराजकारणBJPभाजपाElectionनिवडणूक