शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

Video: अपघातग्रस्त व्यक्तीसाठी आले अजितदादा धावून; तातडीने आपला ताफा थांबवून केली रुग्णालयात जाण्याची सोय

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2022 14:41 IST

कार्यक्रमात व्यस्त असलेल्या अजितदादांनी नंतर देखील आठवणीने त्या अपघातग्रस्ताच्या प्रकृतीची रुग्णालय प्रशासनाकडे चौकशी केली

बारामती : माळेगाव कॉलनी येथे रस्त्यावर अपघातग्रस्त व्यक्ती अढळून आल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपला ताफा थांबवत अपघातग्रस्ताला तातडीने बारामती येथील रूग्णालयात दाखल करण्याची सोय केली. तसेच कार्यक्रमात व्यस्त असलेल्या अजितदादांनी नंतर देखील आठवणीने त्या अपघातग्रस्ताच्या प्रकृतीची रुग्णालय प्रशासनाकडे चौकशी केली.

व्यस्त दिनक्रमातून आपला माळेगाव येथील दौरा करून उपमुख्यमंत्री अजित पवार रविवारी (दि. १०) बारामतीच्या दिशेने येत होते. यावेळी माळेगाव कॉलनी येथे पवार यांना रस्त्यावर अपघात झाल्याचे निदर्शनास आले. पवार यांनी तातडीने आपला ताफा थांबवत अपघातग्रस्ताला रूग्णालयात दाखल करण्यासाठी ताफ्यातील चारचाकीची सोय केली. सहा वाजल्यापासून बारामती तालुक्यात अजित पवार यांचे विविध ठिकाणच्या पाहणी, उद्घाटन, भेटी व भूमीपूजनाचे कार्यक्रमा निमित्त बारामती दौरा आयोजित करण्यात आला होता.  दरम्यान दुपारी अकरा वाजता माळेगाव येथील पोलीस दलाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ग्रामसुरक्षा दलाच्या कार्यक्रमास त्यांनी उपस्थिती लावली. हा कार्यक्रम आटोपून बारामतीतील एका शोरूमच्या उद्घाटनासाठी पवार हे बारामतीकडे निघाले होते. त्याच वेळी त्यांच्या वाहनांचा ताफा शारदानगर नजीक आला असता माळेगाव कॉलनी येथे बारामती-नीरा रस्त्यावर एका वाहनाचा अपघात झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.  

त्यांनी तातडीने आपल्या वाहनांचा ताफा थांबवला आणि अपघातग्रस्तांना मदत करण्याची सूचना केली. यानंतर बारामतीचे राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष व पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक संभाजी होळकर यांच्या वाहनातील लोकांना बसण्याची व्यवस्था करून त्या अपघातग्रस्तांना त्या वाहनातून बारामतीतील रूग्णालयात दाखल करण्याची सूचना केली. त्यानंतर बारामतीतील रूग्णालय प्रशासनाशी संपर्क साधत पवार यांनी त्या अपघातग्रस्तांवर उपचार करण्याची सूचना केली.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारAccidentअपघातNCPराष्ट्रवादी काँग्रेसdocterडॉक्टरhospitalहॉस्पिटल