शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

"वाईन विकतो दारु नाही...", देवेंद्र फडणवीसांना अजित पवारांचं प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2022 11:43 IST

'आम्ही पण सरकारमध्ये काम करत असताना जनतेचे नुकसान होईल असे निर्णय घेत नाही'- अजित पवार

पुणे: सध्या राज्यात किराना दुकानात वाईन विक्रीला परवानगी दिल्याने विरोधक आणि सत्ताधारी एकमेकांवर टीका करताना दिसत आहेत. यापूर्वी भाजप नेते देवेंद्र फडणवीस (devendra fadanvis) यांनी किराना दुकानात वाईन विक्री खपवून घेतली जाणार नाही, असं म्हटलं होतं. फडणवीसांच्या विधानाला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांनी उत्तर दिले आहे.

पवार म्हणाले, वाईन आणि दारू त्याच्यामध्ये जमीन-अस्मानचा फरक आहे. आपल्या राज्यातले अनेक शेतकरी वेगवेगळ्या प्रकारची फळे तयार करतात. द्राक्षातून, काजूतून वाईन तयार केली जाते. यासोबतच अनेक वेगवेगळ्या फळातून वाइन तयार केली जाते. आपल्याकडे जेवढी वाईन तयार होते तेवढी वाईन खपत नाही. आजूबाजूच्या राज्यात त्याची विक्री केली जाते. काही परदेशात एक्सपोर्ट केली जाते. काही देशात पाण्याऐवजी वाइन्स पितात हे सर्वांनाच ठाऊक आहे. परंतु काही जाणीवपूर्वक त्याला मद्यराष्ट्र म्हणत वेगळेच महत्त्व दिले.

पुढे बोलताना पवार म्हणाले, शेवटी आम्ही पण सरकारमध्ये काम करत असताना जनतेचे नुकसान होईल असे निर्णय घेत नाही. सुपर मार्केटमध्ये वाईन विक्री करण्यासाठी अनेक वर्षांपूर्वीची मागणी होती. त्यामुळे काही नियम अटी घालून वाईन विक्रीसाठी परवानगी दिलेली आहे. पुढच्या कॅबिनेट बैठकीनंतर याची अंमलबजावणी होईल.परंतु काही लोकांनी यावरून सरकारची बदनामी सुरू केली आहे.

टॅग्स :PuneपुणेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAjit Pawarअजित पवारMaharashtraमहाराष्ट्र