शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

Video : अरे बाबा, त्याला कोरोना झाला असेल तर ? अजित पवारांनी कोरोनाच्या भीतीने कार्यकर्त्याचा पुष्पगुच्छच नाकारला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2021 15:28 IST

उपमुख्यमंत्री अजित पवार हे नेहमीच त्यांच्या रोखठोक शैलीसाठी चर्चेत असतात.

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार हे नेहमीच त्यांच्या रोखठोक शैलीसाठी चर्चेत असतात. कोरोना काळात स्वयंशिस्तीचे दर्शन घडवितानाच अजितदादा कधी कधी नियमांचे पालन न करणाऱ्या कार्यकर्त्यांना चारचौघात चार खडे बोल सुनावण्यात देखील मागे पुढे पाहत नाही असेेही अनेकवेळा घडले आहे. आजदेखील पुण्यात एका कार्यक्रमावेळी अजितदादांनी कार्यकर्त्याचे विनोदात्मक शैलीतुन चांगलेच कान टोचले. तसेच कोरोनाच्या भीतीने पुष्पगुच्छ नाकारला.

पुण्यातील विभागीय आयुक्त कार्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी(दि. २१) कोरोना आढावा बैठकीचे आयोजित करण्यात आले होते. अजित पवार पुण्यात म्हटले की कार्यकर्ते ओघाने ठरलेलेच असतात. कोरोना आढावा बैठकीपूर्वी विधान भवन आवारात ऑक्सिजन सिलेंडर, कोरोनाबाधित रुग्णांच्या सेवेसाठी चार चाकी वाहनांचा लोकार्पण कार्यक्रम अगदी मोजक्या लोकांमध्ये आयोजित करण्यात आला होता. मात्र, याहीवेळी नेहमीप्रमाणे कार्यकर्ते अजित पवार यांची भेट घेण्यास आले होते. 

यावेळी त्यातलाच एक कार्यकर्ता दादांना म्हणाला,  दादा, तुम्हाला पुष्पगुच्छ द्यायचा आहे. त्यावर अजित पवार म्हणाले, आरे बाबा, काही तरी नियम पाळा, कोणाकडून पुष्पगुच्छ आणला. त्याला कोरोना झाला असेल किंवा नाय काय माहिती? पण जरा काळजी घ्या...असे म्हणताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. त्यानंतर अजित पवार बैठकीसाठी मार्गस्थ झाले.

१० दिवसांनंतर परिस्थिती पाहून लॉकडाउनचा निर्णय राज्यात म्युकोरमायकॉसिसचा इंजेक्शन चा तुटवडा आहे. इंजेक्शन चा वितरणाचे सर्व अधिकार मात्र केंद्राने आपल्याकडे घेतले असल्याचा दावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला. एकट्या पुण्यातच म्युकोरमायकॉसिस चे 300 रुग्ण असल्याचं त्यांनी सांगितलं. लॉकडाऊन बाबत 10 दिवसांनी परिस्थीती पाहून निर्णय घेऊ असेही अजित पवार म्हणाले.

टॅग्स :PuneपुणेAjit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसPoliticsराजकारणcorona virusकोरोना वायरस बातम्या