नाट्यसंमेलनाच्या उद्घाटनास स्वागत समितीचे अध्यक्ष अजित पवार यांची दांडी

By विश्वास मोरे | Updated: January 6, 2024 11:58 IST2024-01-06T11:56:41+5:302024-01-06T11:58:08+5:30

दोन्ही नेते एकाच व्यासपीठावर येणार का? अशी चर्चा रंगली होती...

Ajit Pawar, President of Swagat Committee, at the inauguration of the theater conference | नाट्यसंमेलनाच्या उद्घाटनास स्वागत समितीचे अध्यक्ष अजित पवार यांची दांडी

नाट्यसंमेलनाच्या उद्घाटनास स्वागत समितीचे अध्यक्ष अजित पवार यांची दांडी

पिंपरी : अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे उद्घाटन सोहळा शनिवारी सुरू झाला. कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष अजित पवार यांनी उद्घाटन सोहळ्यास दांडी मारली.

चिंचवड येथील केशवनगर येथील मोरया गोसावी क्रीडा संकुलामध्ये शनिवारी आणि रविवारी नाट्य संमेलन होत आहे. आज सकाळी उद्घाटन समारंभास सुरुवात झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उद्योग मंत्री उदय सामंत, संमेलनाध्यक्ष प्रेमानंद गज्वी, नियोजित संमेलन अध्यक्ष डॉ. जब्बार पटेल आदी उपस्थित होते.

अखेर दादा आलेच नाही!

निमंत्रण पत्रिका नाट्य परिषदेने प्रसिद्ध केली होती.  त्यात नाट्य परिषदेचे आजीव सदस्य शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव टाकले होते. दोन्ही नेते एकाच व्यासपीठावर येणार का? अशी चर्चा रंगली होती. दरम्यान पुणे येथे झालेल्या कार्यक्रमाचे परिषदेच्या कार्यक्रमास अजित पवार उपस्थित नव्हते. त्यांनतर पिंपरी चिंचवड मधील आजच्या नाट्यसंमेलन उद्घाटन सोहळ्यास  स्वागत समिती अध्यक्ष अजित पवार  यांची अनुपस्थिती चर्चेची ठरली.

Web Title: Ajit Pawar, President of Swagat Committee, at the inauguration of the theater conference