पुणे जिल्ह्यातील बारामती बुधवारी (२८ जानेवारी २०२६) सकाळी झालेल्या भीषण विमान अपघाताप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी आता कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे. या अपघातात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. याप्रकरणी बारामती तालुका पोलीस ठाण्यात अपघाती मृत्युची नोंद करण्यात आली आहे.
पुणे ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या अपघाताशी संबंधित सर्व तांत्रिक आणि स्थानिक पैलूंचा कसून तपास केला जात आहे. प्राथमिक प्रक्रियेनंतर हा तपास आता महाराष्ट्र गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपवला जाणार आहे. एएआयबी या अपघाताचा तांत्रिक तपास करत आहे. एएआयबीने दिलेल्या निष्कर्षांच्या आधारे सीआयडी आपला सखोल तपास पूर्ण करेल. सध्या बारामती पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा आणि प्राथमिक माहिती गोळा करण्याचे काम पूर्ण केले आहे.
दरम्यान, बुधवारी सकाळी अजित पवार हे मुंबईहून बारामतीकडे चार्टर्ड विमानाने निघाले होते. मात्र, बारामती विमानतळावर लँडिंगच्या प्रयत्नात असताना विमानाला भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत अजित पवार, त्यांचे सुरक्षा रक्षकासह एकूण पाच जणांचा मृत्यू झाला.
Web Summary : Pune police filed an ADR in the Baramati plane crash case where Deputy CM Ajit Pawar and four others died. Investigation to be handed to CID after initial probe and AAI report.
Web Summary : बारामती विमान दुर्घटना में पुणे पुलिस ने एडीआर दर्ज की, जिसमें उपमुख्यमंत्री अजित पवार और चार अन्य की मौत हो गई। प्रारंभिक जांच और एएआई रिपोर्ट के बाद जांच सीआईडी को सौंपी जाएगी।