पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेत स्वबळावर लढत असलेल्या भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांच्या घमासान सुरू आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दोन्ही महापालिकांमध्ये भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून भाजपा आणि स्थानिक नेत्यांना घेरले. त्यामुळे भाजपाचे नेतेही अजित पवारांवर तुटून पडताना दिसत आहेत. अजित पवारांनी केलेल्या आरोपांना उत्तर देताना भाजपाचे आमदार महेश लांडगे चांगलेच संतापले. अजित पवार हेच महाराष्ट्राचे आका आहेत, असा घणाघात लांडगेंनी केला.
अजित पवारांनी पिंपरी चिंचवड येथील सभेत बोलताना भाजपावर भ्रष्टाचाराचे आरोप केले. त्याला उत्तर देताना आमदार महेश लांडगे म्हणाले, "आधी स्वतःच्या लेकाचे पराक्रम बघा. ते स्वतः आका आहेत, हे त्यांनी जाहीर करावे. मला पिंपरी चिंचवडचा आका म्हणत आहेत. मूळात अजित पवार हेच महाराष्ट्राचे आका आहेत", अशी टीका आमदार महेश लांडगे यांनी केली.
पिंपरी चिंचवडमधील भ्रष्टाचाराचा आका संपवायचा आहे, अशी टीका अजित पवारांनी सभेत बोलताना केली होती. त्यावर महेश लांडगे म्हणाले, "सध्या अजित पवार यांचा अहंकार बोलत आहे. ते नैराश्यात आहेत."
"...म्हणून अजित पवार भाजपासोबत आले"
अजित पवारांना भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर उत्तर देताना आमदार महेश लांडगे म्हणाले, "स्वतःचा भ्रष्टाचार लपवण्यासाठी अजित पवार भाजपासोबत आले आहेत. अजित पवारांनी आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करू नयेत."
"मुलगा पार्थ पवारांचे पराक्रम पहा. जे स्वतःच्या काकाचे होऊ शकले नाहीत, ते पिंपरी चिंचवडचे होतील का? आमच्यावरील भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध करायचे असतील, तर मी महापालिका प्रशासन आणि अजित पवार समोरासमोर यावं. मग सर्व उत्तरे मिळतील", असा पलटवार महेश लांडगेंनी केला.
Web Summary : BJP MLA Mahesh Landge accuses Ajit Pawar of being Maharashtra's 'kingpin' of corruption. Landge retorted to Pawar's accusations of corruption by bringing up his son, Parth Pawar.
Web Summary : भाजपा विधायक महेश लांडगे ने अजित पवार पर महाराष्ट्र में भ्रष्टाचार का 'सरगना' होने का आरोप लगाया। लांडगे ने पवार के भ्रष्टाचार के आरोपों का जवाब उनके बेटे पार्थ पवार का जिक्र करके दिया।