शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Corona Virus in Pune: पुण्यात एक ते 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन करण्याची मागणी; अजित पवारांचा विरोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2021 11:57 IST

Corona Virus in Pune, Discussion on Lockdown or curfew: पुण्यात गेल्या काही दिवसांपासुन रुग्ण संख्या प्रचंड वाढत आहे. दर दिवशी ६ हजारांच्या पुढे ही रुग्णवाढ गेली आहे. यातल्या अनेक जणांच्या चाचण्या खासगी प्रयोगशाळेत केल्या जात आहेत.

पुणे : वाढत्या कोरोना रुग्ण संख्येचा पार्श्वभूमीवर पुणे शहरासाठी अधिकचे निर्बंध की लॉकडाऊन (Pune Lockdown) लागणार याचा निर्णय आज घेतला जाणार आहे. पुण्यात नेमके किती ‘खरे’ पॅाझिटिव्ह आहेत याचा आढावा आता घेतला जाणार आहे. खासगी प्रयोगशाळेकडून दिल्या जाणाऱ्या अहवालाची तपासणी आता त्रयस्थ संस्थेमार्फत केली जाणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीतमध्ये घेण्यात आलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. याचबरोबर प्रशासनाने पुण्यात कडक लॉकडाऊन करण्याची मागणी केली. मात्र, अजित पवारांनी (Ajit Pawar) यास विरोध केला आहे. (Ajit pawar meeting with pune government officers on Pune corona Virus situation.)

पुण्यात गेल्या काही दिवसांपासुन रुग्ण संख्या प्रचंड वाढत आहे. दर दिवशी ६ हजारांच्या पुढे ही रुग्णवाढ गेली आहे. यातल्या अनेक जणांच्या चाचण्या खासगी प्रयोगशाळेत केल्या जात आहेत. यातल्या अनेक लोकांना कोरोनाची कोणतीही लक्षणे नाहीत. त्यामुळे आता खासगी प्रयोगशाळा आयसीएमआरचे निर्बंध पाळतात का याची तपासणी आता केली जाणार आहे. आज एकुण रुग्णसंख्या लक्षणे याचा आढावा घेण्यात आला. त्यात हा निर्णय घेतला गेला आहे.

पुण्यात कडक लॉकडाऊन करण्याची मागणी प्रशासन करत आहे. तर अजित पवारांसह आयएएस अधिकाऱ्यांनीदेखील यास विरोध केला आहे. यामुळे आणखी कडक निर्बंधांवर चर्चा सुरु झाली आहे. पुण्यात कोरोनाचा आकडा वाढू लागला आहे. यामुळे ही बैठक होत आहे. 

रुग्णांना बेड मिळेनात...

पुण्यामध्ये गेले काही  सातत्याने रुग्ण संख्या वाढते आहे. त्यातच आता गंभीर रुग्णांना बेड मिळेना अशी परिस्थिती आली आहे. ही एकूण परिस्थती लक्षात घेता अधिकचे निर्बंध किंवा लोकडाऊन याचा विचार सुरु असल्याचे संकेत आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिले होते. दरम्यान आर्थिक घडी बिघडू नये म्हणून लोकडाऊन नको अशी भूमिका पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी घेतली होती. त्याच पार्श्वभूमीवर आज आढावा बैठक घेतली जात आहे. 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारPuneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्या