शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Ajit Pawar Funeral: ‘दादा... परत या..!'च्या आक्रोशात काटेवाडी स्तब्ध; अजित पवारांना अखेरचा निरोप देताना जनसागर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2026 18:58 IST

‘एकच वादा... अजित दादा’, ‘अजितदादा अमर रहे’, ‘परत या... परत या दादा’ अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला.

बारामती : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पार्थिव पवार कुटुंबीयांच्या काटेवाडी (ता. बारामती) येथील पवार फार्म या निवासस्थानी आणण्यात आले. यावेळी ‘दादा... दादा...’च्या हंबरड्याने संपूर्ण परिसर अक्षरशः थिजून गेला. जनसामान्यांच्या आक्रोशात, अश्रूंमध्ये आणि घोषणांमध्ये काटेवाडीने आपल्या लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप दिला.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अंत्यदर्शनासाठी व अंतिम निरोप देण्यासाठी पहाटेपासूनच काटेवाडीत जनसमुदायाची अलोट गर्दी उसळली होती. सुरुवातीला खासदार सुनेत्रा पवार, खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार, मुले पार्थ पवार व जय पवार, राजेंद्र पवार, श्रीनिवास पवार, युगेंद्र पवार आदी पवार कुटुंबीय दाखल झाले. त्यानंतर वैद्यकीय महाविद्यालयातून उपमुख्यमंत्री पवार यांचे पार्थिव काटेवाडीतील निवासस्थानी आणण्यात आले.

यावेळी विविध राजकीय नेते, पदाधिकारी यांच्यासह काटेवाडीतील महिला, ग्रामस्थ, ज्येष्ठ नागरिकांनी रांगा लावत पवारांचे अंत्यदर्शन घेतले. उपमुख्यमंत्री पवार यांच्या आठवणींनी अनेकांना गहिवर अनावर झाला. पवार यांचे बालपण याच परिसरात गेले असल्याने ग्रामस्थांनी त्यांच्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला. सुरुवातीच्या काळात याच शेतात शेती करत त्यांनी आपल्या जीवनाची व राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली होती. याच ठिकाणी आज त्यांना शेवटचा निरोप देण्याची वेळ ग्रामस्थांवर आली.

काटेवाडी येथून बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानपर्यंत पालखी मार्गाच्या बाह्यवळण रस्त्यावरून शेकडो वाहनांच्या ताफ्यासह सजवलेल्या वाहनातून अंत्ययात्रा काढण्यात आली. अंत्ययात्रेच्या मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा ग्रामस्थांची प्रचंड गर्दी उसळली होती. ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करत ग्रामस्थांनी आपल्या लाडक्या नेत्याचे अखेरचे दर्शन घेतले. “आमचा गरिबांचा मोठा आधार गेला, आता आमच्या व्यथा कुणाला सांगायच्या?” असा टाहो फोडत अनेकांनी दादांना अंतिम निरोप दिला.

कातर शब्दांनी अश्रूंची वाट केली मोकळी

“प्रत्येक दिवाळीला, प्रत्येक सणाला दादांना शुभेच्छा द्यायला यायचो... आज आमच्यावर काय वेळ आली,” अशा कातर शब्दांत काटेवाडीकरांनी आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. पत्नी खासदार सुनेत्रा पवार, मुले पार्थ पवार व जय पवार यांच्यासह कुटुंबीयांनी हात जोडत, शब्दांविना आपल्या भावना व्यक्त केल्या. हे दृश्य पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले. ‘एकच वादा... अजित दादा’, ‘अजितदादा अमर रहे’, ‘परत या... परत या दादा’ अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला. विशेषतः महिलांच्या टाहोने वातावरण अधिकच भावनिक बनले.  

गाव बुडाले शोकसागरात

निर्मलग्राम अभियानात राज्याला नावलौकिक मिळवून देण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुनेत्रा पवार यांनी घेतलेल्या परिश्रमांच्या आठवणींनाही यावेळी उजाळा देण्यात आला. प्रत्येक दौऱ्यात मातोश्री आशाताई पवार यांची भेट घेण्यासाठी अजित पवार आवर्जून काटेवाडीत येत असत. त्यावेळी ग्रामस्थांच्या समस्या, प्रश्न जाणून घेऊन तत्काळ तोडगा काढणारा नेता आज अनंताच्या प्रवासाला निघून गेला, ही भावना काटेवाडीकरांना अस्वस्थ करत होती. या घटनेने काटेवाडी गाव जणू नि:शब्द झाले असून, संपूर्ण गाव शोकसागरात बुडाल्याचे हृदयद्रावक चित्र पाहायला मिळाले. 

English
हिंदी सारांश
Web Title : Katewadi bids tearful farewell to Ajit Pawar amidst heartfelt cries.

Web Summary : Ajit Pawar's funeral in Katewadi saw emotional scenes. Villagers mourned their leader, recalling his contributions and simple beginnings. A large procession conveyed him to Baramati, with heartbroken residents lining the route. The village grieves the loss of their beloved 'Dada'.
टॅग्स :Ajit Pawarअजित पवारDeathमृत्यूNCPराष्ट्रवादी काँग्रेसBaramatiबारामतीPlane Crashविमान दुर्घटना