शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Ajit Pawar Funeral : अजित पवारांच्या अंत्यविधीसाठी ११ हजार पोलिसांचा चोख बंदोबस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2026 18:50 IST

- उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लाखांच्या उपस्थितीत अखेरचा निरोप 

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार गुरुवारी करण्यात येणार होते. या अंत्यसंस्कारासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यापासून विविध राज्यातील मंत्री, महाराष्ट्राचे जवळपास सर्व मंत्रिमंडळ त्याचबरोबर आमदार, खासदार आणि लाखोंचा जनसमुदाय उपस्थित राहणार असल्याने पुणे ग्रामीण पोलिस दलावर बंदोबस्ताची मोठी जबाबदारी येऊन पडली होती.

पुणे, पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयासह होमगार्ड, राज्य राखीव पोलिस दल यांच्यासह अन्य पोलिस दलांतील ११ हजार पोलिस अधिकारी कर्मचारी यांच्या मदतीने ग्रामीण पोलिसांनी ही जबाबदारी यशस्वीपणे पार पडली. २४ तासांच्या आत महाराष्ट्र पोलिसांनी समन्वयातून हा प्रचंड मोठा बंदोबस्त पार पाडला.

पोलिस महासंचालक सदानंद दाते, पोलिस आयुक्त अमितेश कुमार, विनयकुमार चौबे, विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांच्यासह अनेक वरिष्ठ पोलिस अधिकारी जातीने या संपूर्ण बंदोबस्तावर लक्ष ठेवून होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाल्याचे समजल्यानंतर संपूर्ण राज्यातून त्यांचे चाहते, समर्थक मोठ्या संख्येने बारामतीकडे येऊ लागले होते. अचानक उद्भवलेल्या या परिस्थितीला तोंड देण्यासाठी सर्वच पोलिस सज्ज झाले. पोलिस महासंचालक सदानंद दाते हे स्वत: संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून होते.

बारामतीमध्ये येणारे लाखो समर्थक, चाहते तसेच असंख्य मान्यवर यांची येणारी वाहने, त्यांना विद्या प्रतिष्ठान येथील अंत्यसंस्काराच्या ठिकाणी जाण्यासाठी रस्ता मोकळा ठेवणे़ त्याचवेळी सर्वसामान्यांना तेथे जाण्यासाठी कोणताही त्रास होऊ नये, अशी सर्व व्यवस्था करण्याची मोठी जबाबदारी होती. त्याचवेळी हा दु:खद प्रसंग असल्याने येणाऱ्या लोकांना नेहमीचा पोलिसी खाक्या न दाखवता संपूर्ण गर्दीचे व्यवस्थापन करण्याची मोठी जबाबदारी होती.

यासाठी पुणे शहर पोलिस दलातील पोलिस आयुक्त, अपर पोलिस आयुक्त, पोलिस उपायुक्त, सहायक पोलिस आयुक्त, पोलिस निरीक्षक, अंमलदार असा सुमारे ८०० जणांचा बंदोबस्त नेमण्यात आला होता.

पिंपरी-चिंचवड पोलिस दलातील पोलिस आयुक्त, २ पोलिस उपायुक्त, २ सहायक पोलिस आयुक्त, १० पोलिस निरीक्षक, २३ सहायक पोलिस निरीक्षक, उपनिरीक्षक व अंमलदार असा ४५० जणांचा फौजफाटा नेमण्यात आला होता. याशिवाय ठाणे, नवी मुंबई, सातारा, कोल्हापूर, सांगली येथील पोलिस फौजफाटा बंदोबस्ताला मागविण्यात आला होता़.

याशिवाय बारामतीकडे येणाऱ्या-जाणाऱ्या सर्व रस्त्यांवर कोठेही वाहतूककोंडी होऊ नये, यासाठी लगतच्या सर्व जिल्ह्यांमधील महामार्गावर वाहतूक विभागाचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. अनेक पोलिस अधिकारी, पोलिस अंमलदार हे गेल्या २४ तासांपासून रात्रभर या संपूर्ण बंदोबस्ताची आखणी करीत होते. अशा प्रसंगी इतका मोठा बंदोबस्त करण्याचे नियोजन ग्रामीण पोलिस दलाने यशस्वी केले.

English
हिंदी सारांश
Web Title : 11,000 Police Deployed for Ajit Pawar's Funeral Procession Security

Web Summary : Maharashtra Police mobilized 11,000 personnel for Ajit Pawar's funeral. High-profile attendees and a large public gathering necessitated extensive security measures. Senior officers oversaw traffic management and crowd control, ensuring smooth proceedings across Baramati.
टॅग्स :Ajit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसBaramatiबारामतीPlane Crashविमान दुर्घटनाDeathमृत्यू