शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

Baramati Vidhan Sabha 2024: शर्मिला पवार यांनी केलेले आरोप धादांत खोटे असल्याचे म्हणत अजित पवारांनी ते फेटाळले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2024 17:59 IST

आमच्या कार्यकर्त्यांनी कोणालाच धमकावले नाही, तिथे सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. तसा काही प्रकार घडला असेल तर निवडणूक अधिकारी ठरवतील

बारामती : बारामती शहरातील  महात्मा गांधी बालक मंदिर या मतदान केंद्रावरील बोगस मतदानाचा आरोप झाल्यावर स्वत: उपमुख्यमंत्री अजित  पवार यांनी  मतदानकेंद्रावर धाव घेतली. त्यावेळी उपमुख्यमंत्री पवार यांनी शर्मिला पवार यांनी केलेले सर्व आरोप धादांत खोटे असल्याचं म्हणत फेटाळून लावले.  मला माझ्या कार्यकर्त्यांवर विश्वास आहे. बोगस मतदानाची निवडणूक आयोग तपास करतील. तक्रारीमध्ये काही तथ्य असायला हवे, उलट माझ्या पोलिंग एजंटला बाहेर काढल्याचं अजित पवार म्हणाले.  यावेळी मतदान केंद्रावर मोठी गर्दी झाल्याचे चित्र होते. पत्रकारांशी बोलताना उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, आमच्या कार्यकर्त्यांनी कोणालाच धमकावले नाही, तिथे सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. तसा काही प्रकार घडला असेल तर निवडणूक अधिकारी ठरवतील. माझे कार्यकर्ते सुसंस्कृत महाराष्ट्रातील आहेत. त्यांनी असे काहीही केले नाहीये. शर्मिला पवार यांचे आरोप धांदात खोटे असल्याचे अजित पवार यांनी म्हटले. उलट माझ्या बुथ प्रमुखाने मला सांगितले की, दादा मी आतमध्ये बसलेलो असताना त्यांनी मला बाहेर काढले, असे बाहेर काढण्याचा अधिकार फक्त निवडणूक अधिकाऱ्याला असतो.

मी पण माझ्या कार्यकर्त्यांना तक्रार द्यायला सांगतो. त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली असेल तर पोलीस तपास करतील आणि सत्य बाहेर येईल. मुळात म्हणजे या तक्रारीमध्ये काहीच सत्य नाहीये. सगळ्यांनी आचारसहिंतेचे पालन करावे. यासोबतच मतदान त्या तुलनेत कमी झालंय. लोकांनी घराबाहेर पडून मतदान करावे, कोणत्याही उमेदवाराला मतदान करा पण मतदानाचा हक्क बजावावा, असे उपमुख्यमंत्री पवार म्हणाले. स्लीपबाबत केलेले आरोप बिनबुडाचे आहेत. माझ्या कार्यकर्ते यांना मतदान केंद्रातून बाहेर काढणे चुकीचे आहे. आमचे कार्यकर्ते आचारसंहितेचे पालन करुनच काम करतात, असे पवार म्हणाले. तर उपमुख्यमंत्री पवार यांचे निवडणुक प्रतिनिधी किरण गुजर यांनी शर्मिला पवार यांनी मतदान केंद्रात जाण्यावर आक्षेप घेतला आहे. त्या उमेदवार,किंवा उमेदवार प्रतिनिधी देखील नाहीत,त्यामुळे त्या कोणत्या अधिकारातून मतदान केेंद्रात गेल्या,असा सवाल गुजर यांनी केला आहे.

बारामती विधानसभेतील काका पुतण्याची निवडणुक चांगलीच लक्षवेधी ठरली आहे. शरद पवार गटाच्या उमेदवार युगेंद्र पवार यांच्या आई शर्मिला पवार यांनी अजित पवार गटाकडून दमदाटी केली जात असल्याचा आरोप केला आहे. तसेच मतदारांना घड्याळाच्या चिन्हाची बनावट स्लिप दिली जात असल्याचे शर्मिला पवार यांनी सांगितले होते. तसेच कार्यकर्त्यांना दमदाटी केल्याचे त्यांनी माध्यमांसमोर सांगितले होते. 

टॅग्स :Puneपुणेbaramati-acबारामतीmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Ajit Pawarअजित पवारyugendra pawarयुगेंद्र पवारSharad Pawarशरद पवार