शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
2
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
3
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
4
...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
5
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
6
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
7
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
8
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
9
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
10
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
11
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
12
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
13
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
14
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
15
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
16
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
17
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
18
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
19
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
20
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू

अजित पवारांचा निर्णय शॉकिंग; मी शरद पवारांबरोबरच, वंदना चव्हाण यांची प्रतिक्रिया

By राजू इनामदार | Published: July 02, 2023 3:50 PM

Maharashtra Political Crisis - शरद पवार हे या प्रतिकूल परिस्थितीमधून मार्ग काढतील असा वंदना चव्हाण यांचा विश्वास

पुणे: राज्याच्या राजकारणात पुन्हा मोठा भूकंप झाला आहे. शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली असल्याच्या चर्चा सुरू आहेत. अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या ३० आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला आहे. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले आहे. अशातच खासदार वंदना चव्हाण यांनी मी शरद पवार यांच्याबरोबरच असल्याचे सांगितले आहे.  

चव्हाण म्हणाल्या अजित पवार व अन्य आमदारांचा निर्णय शॉकिंग असल्याचे त्या म्हणाल्या. खासदार चव्हाण कार्यक्रमासाठी म्हणून सोलापूरात होत्या. लोकमत बरोबर बोलताना त्यांनी ठामपणे आपण शरद पवार यांच्याबरोबरच आहोत असे सांगितले. शरद पवार यातून नक्की मार्ग काढतील असा विश्वास व्यक्त करून त्या म्हणाल्या, या घटनेनंतर माझे शरद पवार यांच्याबरोबर काहीही बोलणे झालेले नाही. पण ते व्हायलाच हवे असे मला वाटत नाही, कारण मी शरद पवार यांच्याबरोबरच आहे.  अजित पवार यांचा हा निर्णय ठरवून झाला असावा असे वाटण्याजोगी स्थिती आहे. थेट शपथविधी व्हावा हेही धक्कादायक आहे. शरद पवार यांना प्रतिकूल परिस्थितीमधून मार्ग कसा काढायचा याची चांगली माहिती आहे. त्यामुळे ते यातूनही मार्ग काढतील. खासदार सुनील तटकरे अजित पवार यांच्याबरोबर गेलेत, याकडे लक्ष वेधले असता खासदार चव्हाण यांनी यावर काहीच बोलायचे नाही असे सांगितले. 

राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. तर छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, हसन मुश्रीफ,धनंजय मुंडे, आदिती तटकरे, संजय बनसोडे, अनिल पाटील, धर्मरावबाबा आत्राम यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.  शिंदे-फडणवीस सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला ९ मंत्रिपदे दिली आहेत.  

टॅग्स :PuneपुणेVandana Chavanवंदना चव्हाणAjit Pawarअजित पवारSharad Pawarशरद पवारMaharashtra Political Crisisमहाराष्ट्रातील सत्तासंघर्ष