शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

अजित पवारांची जोरदार बॅटिंग; जयंत पाटील यांना रोहित शर्माची उपमा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2018 15:02 IST

अजित पवारांच्या फटकेबाजीला उपस्थितांची दाद

पुणे: ज्या पद्धतीनं काल अडचणीत असणाऱ्या मुंबईला रोहित शर्माने जिंकून दिलं, त्याप्रमाणे जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला आगामी निवडणुकीत जिंकून द्यावं, अशी राजकीय बॅटिंग अजित पवार यांनी पुण्यात केली .राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी जयंत पाटील यांची एकमताने निवड झाल्यानंतर ते बोलत होते.अजित पवार यांनी भाषणात क्रिकेटचा उल्लेख करत जोरदार फटकेबाजी केली. 'सध्या आयपीएलचे दिवस आहेत. जयंत पाटील हे उत्तम बॅट्समन आहेत. ते अनेकदा फिरकीही घेत असतात. मुंबई आयपीएलमधून जवळपास बाहेर पडली, असे वाटत असताना, ज्या पद्धतीनं रोहित शर्मा शेवटपर्यंत टिकून राहिला, त्या पद्धतीनं आमचे कॅप्टन झालेल्या पाटील यांनी विजय संपादन करावा, अशी मी त्यांना विनंती करतो,' असं अजित पवारांनी म्हणताच उपस्थितांनी त्यांना टाळ्यांनी दाद दिली. दिवंगत आर. आर. पाटील यांच्या कन्येच्या विवाहाचं आमंत्रण त्यांनी यावेळी सर्वांना दिलं. 'आर. आर. पाटील यांचा स्वच्छ प्रतिमेला कोणीही विसरू शकत नाही.आज ते आपल्यात नाहीत.मात्र 1 मे रोजी त्यांची कन्या स्मिताचे लग्न आहे. पुण्यात होणाऱ्या या लग्नाची सुमनताई पाटील यांनी पत्रिका दिली असेलच. पण राहिली असेल तरी हक्कानं येऊन सर्वांनी तिला आशीर्वाद द्यावेत,' असं आवाहन त्यांनी केलं. 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारJayant Patilजयंत पाटीलNCPराष्ट्रवादी काँग्रेस