शहरं
Join us  
Trending Stories
1
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
2
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
3
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
4
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
5
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
6
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
7
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
8
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
9
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
10
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
11
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
12
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
13
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
14
जबरदस्त कॅमेरा आणि दमदार बॅटरी, किंमत १० हजारांहून कमी; नव्या 5G फोनची सर्वत्र चर्चा!
15
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
16
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
17
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
18
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
19
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
20
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक

‘छत्रपती’च्या नूतन संचालकांना ‘अजितदादां’चा कानमंत्र; काटेवाडीच्या निवासस्थानी घेतली बैठक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2025 12:38 IST

छत्रपती कारखान्याला पूर्ववैभव प्राप्त करण्यासाठी उपमुख्यमंत्री पवार यांनी क्रीडामंत्री भरणे यांना बरोबर घेत गेले अनेक वर्षे विरोधक असणाऱ्या जाचक यांच्यासमवेत हातमिळवणी केली.

बारामती : भवानीनगर येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्ष उपाध्यक्षपदाच्या निवडीपूर्वी बुधवारी (दि. २८) पहिल्याच दिवशी भल्या सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या काटेवाडी निवासस्थानी नूतन संचालक मंडळाची पवार यांच्या समवेत बैठक पार पडली. क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे, पृथ्वीराज जाचक यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत पवार यांनी संचालक मंडळाला कारखान्याचे पूर्ववैभव प्राप्त करण्यासाठी कानमंत्र दिला.

सहकारातील अभ्यासू आणि जाणकार नेते म्हणून पृथ्वीराज जाचक यांची ओळख आहे. त्यामुळे अडचणीतील छत्रपती कारखान्याला पूर्ववैभव प्राप्त करण्यासाठी उपमुख्यमंत्री पवार यांनी क्रीडामंत्री भरणे यांना बरोबर घेत गेले अनेक वर्षे विरोधक असणाऱ्या जाचक यांच्यासमवेत हातमिळवणी केली. या वेळी पवार यांनी पृथ्वीराज जाचक यांचा चेहरा पाच वर्षे अध्यक्षपदासाठी जाहीर करीत जय भवानीमाता पॅनलमधून निवडणूक लढविली. त्याला सभासदांनी भरभरून प्रतिसाद देत सर्वच्या सर्व २१ जागा भरघोस मतांनी निवडून दिल्या. या पार्श्वभूमीवर पवार यांनी नूतन पदाधिकारी निवडीपूर्वी संचालक मंडळाशी समवेत संवाद साधला, तसेच पदाधिकारी निवडीबाबत सर्वांशी चर्चा करून त्यांची मते जाणून घेतली. यावेळी पवार यांनी ‘छत्रपती’ला गतवैभव प्राप्त करण्यासाठी संचालक मंडळाला कानमंत्र दिला. पदाधिकारी निवडीच्या पहिल्याच दिवशी पवार यांनी कारखान्याच्या कामाची आखणी करण्यास सुरुवात केली आहे.या बैठीकबाबत पृथ्वीराज जाचक यांनी ’लोकमत’शी बोलताना सांगितले की, अजितदादांनी संचालक मंडळाला ‘छत्रपती’ला गतवैभव प्राप्त करण्यासाठी सूचना करीत ‘गाइडलाइन’ दिल्या. सभासदांनी आपल्यावर दाखविलेल्या विश्वासाला पात्र राहून कार्यरत राहा. पारदर्शकपणे कामाला सुरुवात करण्याचे पवार यांनी सूचित केल्याचे जाचक म्हणाले.

 पृथ्वीराज जाचक यांची हॅटट्रीक

पृथ्वीराज जाचक यांची श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदासाठी १९९५ साली प्रथम निवड झाली. त्यानंतर १९९८ साली पुन्हा अध्यक्षपदी जाचक यांची फेरनिवड झाली. २००३ नंतर जाचक हे राष्ट्रवादी काॅंग्रेसपासून बाजूला गेले. त्यानंतर २२ वर्षांनी जाचक यांचे अध्यक्षपदी पुनरागमन झाले आहे. 

‘छत्रपती’चा कारभार कृषी पदवीधरांच्या हाती श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज जाचक आणि उपाध्यक्ष कैलास गावडे हे दोघे कृषी पदवीधर असून, वर्गमित्र देखील आहेत. या योगायोगाची चर्चा आज कारखाना परिसरात रंगली. शेतकऱ्यांच्या संबंधित असलेल्या कारखान्याचा कारभार कृषी पदवीधरांच्या हाती आल्याने सभासदांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

टॅग्स :PuneपुणेBaramatiबारामतीElectionनिवडणूक 2024Sugar factoryसाखर कारखानेAjit Pawarअजित पवारpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड