शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

अरे मी काम करू की सत्कार स्वीकारत फिरू; अजित पवारांची कार्यकर्त्यांवर जोरदार 'फायरिंग' 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2021 20:22 IST

अजित पवारांच्या घेतलेल्या झाडाझडतीनंतर मोठ्या उत्साहाने आलेल्या या कार्यकर्त्यांचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता.

पुणे : राज्य शासनाने नुकत्याच झालेल्या मंत्रीमंडाळाच्या बैठकीत गुंठेवारीचा निर्णय घेतला. हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सत्कार करण्यासाठी 10 ते 12 गावचे ग्रामस्थ आले होते. कोणतीही पूर्व सूचना न देता अचानक एवढ्या मोठ्या प्रमाणावर ग्रामस्थ आल्याने अजित पवारांचा पारा चढला. यावेळी मी सत्कार स्वीकारत बसलो काम कोण करणार असे म्हणत कार्यकर्त्यांना चांगलेच सुनावले. 

उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्यात एका बैठकांच्या निमित्ताने विभागीय आयुक्त कार्यालयात आले होते. यावेळी कोणतीही पूर्व कल्पना न देता शेकडो कार्यकर्ते विभागीय आयुक्त कार्यालयात उपस्थित झाले. यावेळी पवार यांच्या शिस्तीच्या स्वभावाचं दर्शन राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनाच घडले. पवारांचा सत्कार करण्यासाठी आलेल्या या कार्यकर्त्यांवर आणि प्रवक्त्यावंर ते खूपच चिडले. अरे मी  काम करू की सत्कार स्वीकारत फिरू, अशा शब्दांत त्यांनी सुनावलं. त्यामुळे मोठ्या उत्साहाने आलेल्या या कार्यकर्त्यांचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता.

काही पूर्व नियोजीत बैठका आणि कार्यक्रम ठरलेले असल्याने गावकर्‍यांच्या सत्कार समारंभात वेळ गेल्यास पुढचं संपूर्ण शेड्यूल बिघडणार असल्याचं लक्षात आल्याने अजित पवारांनी त्यांच्या प्रवक्त्याला बोलावले आणि थेट फायरिंग सुरू केली. एवढ्या मोठ्या प्रमाणवर गावकरी, कार्यकर्ते आले. आज सत्कार स्वीकारला तर रोजच सत्कार स्वीकारावा लागेल. मी काम करू की सत्कार स्वीकारू? असा सवाल अजित पवार यांनी केला. यावेळी काही गावकरीही तिथेही होते. त्यामुळे दादांचा सत्कार करण्याचा सर्वांचा अपेक्षाभंग झाला. -------

टॅग्स :PuneपुणेAjit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका