शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

विमानसेवेच्या सुरक्षिततेकडे अधिक गांभीर्यानं लक्ष देण्याची गरज; अजित पवारांचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 17:56 IST

Air India Ahmedabad Plane Crash विमानसेवा कंपन्यांनी त्यांच्या विमानसेवेच्या सुरक्षेचा फेरआढावा घेऊन, सुरक्षितता मानकांचं पालन करुन भविष्यात अशी दुर्घटना होणार नाही, हे सुनिश्चित करावं

पुणे : गुजरातच्या अहमदाबाद इथं भीषण विमानअपघात घडला. गुरुवारी एअर इंडियाचं AI171 विमानअहमदाबादहून लंडनच्या गॅटविकला जाणार होते. मात्र उड्डाणानंतर अवघ्या काही मिनिटांतच ६२५ फूटावरून हे विमान खाली जमिनीवर कोसळले. घटनास्थळी एनडीआरएफ टीमसह अग्निशमन दलाच्या गाड्या रेस्क्यू ऑपरेशन करत आहेत. त्याशिवाय आणखी २ टीम तिथे रवाना झाल्या आहेत. अहमदाबादचे महापालिका आयुक्त, पोलीस आयुक्त यांच्यासह सर्व वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी हजर आहेत. या दुर्दैवी घटनेनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आवाहन करत विमानसेवेच्या सुरक्षिततेकडे अधिक गांभीर्यानं लक्ष देण्याची गरज असल्याचे समाजमाध्यमवरून सांगितले आहे. (Air India Ahmedabad Plane Crash) 

अजित पवार म्हणाले, गुजरातच्या अहमदाबाद विमानतळावरुन लंडनला निघालेलं एअर इंडियाचं विमान अहमदाबाद शहरातील इमारतींवर कोसळून झालेल्या अपघातात प्रवासी तसंच स्थानिक नागरिकांचा झालेला मृत्यू ही धक्कादायक, क्लेशदायक, दुर्दैवी घटना आहे. अहमदाबाद शहरातील या विमान अपघातामुळे महाराष्ट्रासह संपूर्ण देश आज दु:खी असून मृत्यू पावलेल्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात प्रत्येक महाराष्ट्रवासी सहभागी आहे.

गुजरात पोलीस, अग्निशमन, रुग्णवाहिका सेवा, वैद्यकीय पथकांनी, सुरक्षा दलांनी दुर्घटनास्थळी पोहोचून बचाव व मदतकार्य तातडीनं राबवलं. परंतु झालेली जीवितहानी खुप मोठी असून ती भरुन निघणार नाही. अपघाताचं निश्चित कारण अद्याप कळलं नसलं तरी, चौकशीअंती ते स्पष्ट होईल. परंतु अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी पावलं उचलण्याची गरज आहे. या दुर्घटनेच्या निमित्तानं विमानसेवेच्या सुरक्षिततेकडे अधिक गांभीर्यानं लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. विमानसेवा कंपन्यांनी त्यांच्या विमानसेवेच्या सुरक्षेचा फेरआढावा घेऊन, सुरक्षितता मानकांचं पालन करुन भविष्यात अशी दुर्घटना होणार नाही, हे सुनिश्चित करावं, असं आवाहन अजित पवारांनी यावेळी केल आहे. 

विमान BJ मेडिकलच्या इमारतीवर कोसळले 

मेघानीनगर भागात या विमानाचा अपघात झाला तिथे BJ मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल होते. याच मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेल इमारतीवर दुर्घटनाग्रस्त विमान धडकले. हॉस्टेलमध्ये कॅन्टिनमध्ये मेडिकलचे विद्यार्थी जेवत असताना हा अपघात घडला. या दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती आहे. अद्याप याची अधिकृत माहिती समोर आली नाही. BJ मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलवर एअर इंडियाचे विमान कोसळले. त्यानंतरचे अनेक फोटो समोर आलेत. या फोटोत विमानाचा मागील भाग इमारतीत घुसल्याचे दिसत आहे. विमानाच्या धडकेमुळे संपूर्ण इमारतीला आग लागली आणि आकाशात काळा धूर पसरला. 

टॅग्स :ahmedabadअहमदाबादairplaneविमानGujaratगुजरातAccidentअपघातPlane Crashविमान दुर्घटनाDeathमृत्यूpassengerप्रवासी