मोटार अपघातात अहमदनगरचे मुख्य कार्यकारी अधिकारी जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:13 AM2021-01-20T04:13:36+5:302021-01-20T04:13:36+5:30

आळेफाटा : नगर-कल्याण महामार्गावर आणे शिवारात इन्होवा कार व जेसीबी यांच्या झालेल्या अपघातात कारमधील अहमदनगर ...

Ahmednagar CEO injured in car accident | मोटार अपघातात अहमदनगरचे मुख्य कार्यकारी अधिकारी जखमी

मोटार अपघातात अहमदनगरचे मुख्य कार्यकारी अधिकारी जखमी

Next

आळेफाटा : नगर-कल्याण महामार्गावर आणे शिवारात इन्होवा कार व जेसीबी यांच्या झालेल्या अपघातात कारमधील अहमदनगर जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ.राजेंद्र क्षीरसागर हे जखमी झाले. तर उपजिल्हाधिकारी संदीप निचीत किरकोळ जखमी झाले. मंगळवारी दुपारी सव्वातीन वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.

याबाबतची माहिती अशी की, नगर येथून कल्याण महामार्गाने संगमनेर येथे आळेफाटा येथून पुणे-नाशिक महामार्गाने मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. राजेंद्र क्षीरसागर व उपजिल्हाधिकारी संदीप निचीत हे कारने जात होते. त्यांची कार आणे शिवारात नांदुरफाटा येथे आली असता नांदुरला जोडणाऱ्या रस्त्याने जेसीबी अचानकपणे महामार्गावर आल्याने त्यांची कार जेसीबीला धडकली.

या अपघातात मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. क्षीरसागर यांच्या डोक्याला मार लागला तर उपजिल्हाधिकारी संदीप निचीत हे किरकोळ जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच अहमदनगर जिल्हा परिषद सदस्य अजय फटांगरे यांना त्यांनी तेथील प्रशांत दाते, रामदास देशमुख व अतुल भांबेरे यांना याबाबत माहिती दिल्यावर त्यांनी घटनास्थळी जात दोघांनाही आळेफाटा येथील रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

फोटो :

नगर कल्याण महामार्गावर आणेजवळील अपघातातील अपघातग्रस्त कार.

Web Title: Ahmednagar CEO injured in car accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.