शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

Ahmedabad Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेमुळे भाजपचे कार्यक्रम, पत्रकार परिषदा रद्द; काँग्रेसचा मशाल मोर्चाही रद्द

By राजू इनामदार | Updated: June 12, 2025 18:32 IST

Ahmedabad Plane Crash दुर्दैवी घटनेचा शोक व्यक्त करत सर्व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रम, मोर्चे रद्द केले आहेत

पुणे: अहमदाबाद विमान दुर्घटनेमुळे पुण्यातील भारतीय जनता पक्ष व काँग्रेस यांचे कार्यक्रम रद्द करण्यात आले. गुजरातमध्ये गुरुवारी सकाळी हा भीषण अपघात झाला. त्याची दखल घेत कार्यक्रम रद्द करण्यात आले. विमान दुर्घटनेत २४२ प्रवाशांनी किंवा गमावला आहे. या दुर्दैवी घटनेचा शोक व्यक्त करत सर्व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रम, मोर्चे रद्द केले आहेत. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ११ वर्षांच्या कार्यकाळाची माहिती देण्यासाठी केंद्र सरकारने देशातील सर्व राज्यांमधील मोठ्या शहरांमध्ये केंद्रीय मंत्र्यांसह स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या पत्रकार परिषदांचे आयोजन केले होते. पुण्यात गुरुवारी दुपारी पक्ष कार्यालयात पक्षाचे राष्ट्रीय महामंत्री अरुण सिंह तसेच राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची पत्रकार परिषद होणार होती. मात्र, विमान अपघाताची माहिती समजल्यानंतर भाजपने देशातील या सर्व पत्रकार परिषदा रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला. त्यानुसार पक्षाचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी पक्ष कार्यालयात उपस्थित राहून ही पत्रकार परिषद रद्द केली असल्याचे सांगितले. शेलार यांच्या उपस्थितीतील अन्य कार्यक्रमही रद्द करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.

काँग्रेसने राज्यात सर्वत्र मशाल मोर्चाचे आयोजन केले होते. राज्याच्या विधानसभा निवडणुकीमध्ये गैरप्रकार झाल्यासंबंधी पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी जाहीर आरोप केले होते. त्याविषयी जनजागृती करण्यासाठी हे मशाल मोर्चे होते. पुण्यातील मोर्चा शनिवारी (दि.१४ जून ) आयोजित केला होता. तो रद्द केला असल्याचे पक्षाच्या वतीने कळवण्यात आले. मोर्चाची पुढील वेळ नंतर जाहीर करण्यात येणार आहे, असे सांगण्यात आले.

टॅग्स :ahmedabadअहमदाबादPlane Crashविमान दुर्घटनाairplaneविमानAccidentअपघातBJPभाजपाcongressकाँग्रेस