कृषी अधिभार तर गाजर पेट्रोल डिझेलची दरवाढ जनतेचं कंबरडं मोडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:19 IST2021-02-05T05:19:32+5:302021-02-05T05:19:32+5:30

या आंदोलनात बाबू वागस्कर ,अजय शिंदे, प्रल्हाद गवळी, राम बोरकर, नरेंद्र तांबोळी, आशिष देवधर, सुधीर धावडे, राहुल ...

Agricultural surcharge and increase in carrot, petrol and diesel prices will break the backs of the people | कृषी अधिभार तर गाजर पेट्रोल डिझेलची दरवाढ जनतेचं कंबरडं मोडणार

कृषी अधिभार तर गाजर पेट्रोल डिझेलची दरवाढ जनतेचं कंबरडं मोडणार

या आंदोलनात बाबू वागस्कर ,अजय शिंदे, प्रल्हाद गवळी, राम बोरकर, नरेंद्र तांबोळी, आशिष देवधर, सुधीर धावडे, राहुल गवळी, सुनील कदम, सुहास निम्हण, किशोर चिंतामणी आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.

कृषी क्षेत्रात पायाभूत सुविधा आणि विकास करण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील अधिभार वाढवण्याची घोषणा झाली आहे. पेट्रोलवर अडीच रुपये, तर डिझेलवर चार रुपये कृषी अधिभार आकारला जाणार आहे. पेट्रोल व डिझेलचे दर कमी होऊन जनतेला दिलासा मिळेल अशी अपेक्षा होती. अधिभार छुप्या पद्धतीने लागू झाला तर पेट्रोलियम पदार्थांचे दर १०० रुपयांच्या पलीकडे जातील. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर महागाई वाढण्याची शक्यता आहे.

केंद्र शासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करदात्यांना सूट देणे अपेक्षित होते. परंतु, तेथेही निराशा झाली. नागपूर आणि नाशिक मेट्रोला भरघोस मदत करताना मात्र पुण्याला ठेंगा दाखविण्यात आल्याचे शहर अध्यक्ष अजय शिंदे यावेळी म्हणाले.

(फोटो : जेएम एडिटवर पाठविण्यात आले आहेत.)

Web Title: Agricultural surcharge and increase in carrot, petrol and diesel prices will break the backs of the people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.