शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

कृषी पदव्युत्तर सीईटीचा शुक्रवारी निकाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2018 17:46 IST

महाराष्ट्र कृषी विद्यापीठे परीक्षा मंडळामार्फत दि. २३ ते २५ मार्च या कालावधीत सीईटी घेण्यात आली होती. एकुण १८ हजार ३७८ विद्यार्थ्यांना या सीईटीसाठी अर्ज केले होते.

ठळक मुद्देगुणानुक्रमांकानुसार ३९ पदव्यत्तर पदवी महाविद्यालयातील दहा विद्या शाखांच्या एकुण १३२२ जागांवर प्रवेश गुणपत्रक संकेतस्थळावरून डाऊनलोड करता येणार

पुणे : राज्यातील कृषी विद्यापीठातील पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या सामाईक प्रवेश (सीईटी) परीक्षेचा निकाल शुक्रवारी (दि.१३) आॅनलाईन जाहीर केला जाणार आहे. विद्यार्थ्यांना महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या संकेतस्थळावर हा निकाल पाहता येईल. महाराष्ट्र कृषी विद्यापीठे परीक्षा मंडळामार्फत दि. २३ ते २५ मार्च या कालावधीत सीईटी घेण्यात आली होती. एकुण १८ हजार ३७८ विद्यार्थ्यांना या सीईटीसाठी अर्ज केले होते. त्यापैकी १६ हजार ८५८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. पात्र विद्यार्थ्यांमधून गुणानुक्रमांकानुसार ३९ पदव्यत्तर पदवी महाविद्यालयातील दहा विद्या शाखांच्या एकुण १३२२ जागांवर प्रवेश देण्यात येणार आहेत. मंडळामार्फत शुक्रवारी आॅनलाईन निकाल जाहीर केला जाणार असून विद्यार्थ्यांना रात्री बारा वाजल्यापासून निकाल पाहता येईल. विद्यार्थी आपले गुणपत्रक संकेतस्थळावरून डाऊनलोड करून घेऊ शकतात. तसेच निकालाबाबत शंका असल्यास निकाल जाहीर झाल्यापासून सात दिवसांच्या आत फेरतपासणीसाठी परीक्षा नियंत्रक कार्यालयाकडे अर्ज करावा लागेल, अशी माहिती मंडळाचे परीक्षा नियंत्रक डॉ. आर. के. रहाणे यांनी दिली.   दरम्यान, मंडळामार्फत गुरूवारी (दि. १२) सीईटीमध्ये विद्याशाखेनिहाय प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांची नावे प्रसिध्द करण्यात आली आहेत. त्यानुसार कृषी अभ्यासक्रमात रुपेश बोबडे या विद्यार्थ्याने ८९ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला आहे. इतर विद्याशाखांतील विद्यार्थ्यांचे नावे पुढीलप्रमाणे (विद्याशाखा) - विशाल म्हेत्रे (उद्यानविद्या), छतांथू बाबू अंजना बाबु छतांथू नारायण (वनशास्त्र), अजय सातपुते (कृषी अभियांत्रिकी), कांचन स्नेहा सत्येंद्र (अन्नतंत्रज्ञान), दिक्षा मोरे (गृहविज्ञान), दिव्याजीत गोरे (मत्स्यशास्त्र), अक्षय बांडे (कृषी जैवतंत्रज्ञान), अनुराधा वाव्हळे (कृषी व्यवसाय व्यवस्थापन) आणि मुकूंद डवले (काढणीपश्चात व्यवस्थापन).

टॅग्स :Puneपुणेagricultureशेतीeducationशैक्षणिकStudentविद्यार्थी