कृषी पदवी प्रवेशासाठी द्यावी लागणार ‘प्रवेश परीक्षा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2018 12:47 PM2018-02-12T12:47:09+5:302018-02-12T12:48:11+5:30

विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला

 Entrance test for admission to Agriculture degree | कृषी पदवी प्रवेशासाठी द्यावी लागणार ‘प्रवेश परीक्षा’

कृषी पदवी प्रवेशासाठी द्यावी लागणार ‘प्रवेश परीक्षा’

Next
ठळक मुद्देविद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला या वर्षापासून ७० टक्के गुण सीईटी आणि ३० टक्के बारावी परीक्षेतील गुण या आधारे प्रवेश देण्यात येणार

नाशिक : उच्च शिक्षणासाठी बहुतांश अभ्यासक्रमांसाठी प्रवेश परीक्षा अपरिहार्य झालेल्या असताना आता कृषी पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया राबविण्याचा निर्णय उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून घेण्यात आला असून, दि. १० मे रोजी यंदा प्रथमच प्रवेश परीक्षा घेण्यात येणार आहे.
कषी पदवी अभ्यासक्रमासाठी आॅनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रि याही सुरू झाली असून, कृषीसह एकूण दहा पदवी शिक्षणक्र मांच्या प्रवेशासाठी सीईटी परीक्षेसोबत एमएचटी सीईटी, जेईई, नीट तसेच एआयइइएयूजी यापैकी कोणतीही सामायिक प्रवेश परीक्षा ग्राह्य धरण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला असला तरी संबंधिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेऊ इच्छिणाºया विद्यार्थ्यांना यापैकी एक परीक्षा देणे अपरिहार्य ठरणार आहे. राज्यातील चार कृषी विद्यापीठांच्या कार्यक्षेत्रात एकूण १५६ खासगी आणि ३५ शासकीय कृषी महाविद्यालयांमध्ये जवळपास १५ हजार २२७ जागांचा समावेश असून, गतवर्षी ५७ हजार प्रवेश अर्ज आले होते. परंतु, त्यावेळी प्रवेशप्रक्रि या बारावीच्या परीक्षेत प्राप्त गुणांच्या आधारे होती. त्यात कौटुंबिक शेतजमिनीचा सातबारा उतारा, बारावीपर्यंतचे कृषी विषयाचे अतिरिक्त गुण वाढीव गुण म्हणून ग्राह्य धरण्यात येत होते. मात्र या वर्षापासून ७० टक्के गुण सीईटी आणि ३० टक्के बारावी परीक्षेतील गुण या आधारे प्रवेश देण्यात येणार आहेत. तसेच दि. १० मे रोजी तीन सत्रांत बहुपर्यायी स्वरूपात ही स्वंतत्र सीईटी परीक्षा घेतली जाणार आहे.

Web Title:  Entrance test for admission to Agriculture degree

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.