शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

शेतजमिनीच्या वाटपपत्राचे दस्त आता केवळ १०० रुपयातच; नोंदणी शुल्क माफ करण्याचा निर्णय लागू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2025 20:33 IST

नोंदणी न केल्यामुळे भविष्यात शेत जमिनीवर वाद निर्माण होऊन त्याचा शेतकऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना नाहक त्रास सहन करावा लागत असतो.

पुणे : राज्य सरकारने शेतजमिनीच्या वाटपपत्राच्या दस्तावर आकारण्यात येणारे नोंदणी शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, अशा दस्तांवर पूर्वीच्या अधिसूचनेनुसार किमान १०० रुपये मुद्रांक शुल्क आकारण्यात येणार आहे. यापूर्वी जमीन वाटपाचा मोठा हिस्सा वगळून अन्य भागांच्या किमतीच्या १ टक्का नोंदणी शुल्क आकारण्यात येत होते. अशा दस्तांची नोंदणी वैकल्पिक असल्याने तसेच नोंदणी शुल्क जास्त असल्याने दस्तनोंदणी कमी होत होती. या निर्णयामुळे यात वाढ होईल, अशी आशा नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाला आहे.

राज्य सरकारने याबाबतची अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ च्या कलम ८५ नुसार शेतजमिनीचे वाटप करताना मोजणी करून वाटपाच्या दस्तास मुद्रांक शुल्क आणि नोंदणी शुल्क द्यावे लागत होते. यात एकूण हिश्श्यांमधील मोठा हिस्सा वगळून अन्य हिश्श्यांच्या किमतीची बेरीज करून त्यावर एक टक्का नोंदणी शुल्क आकारण्यात येत होते. त्यामुळे ही किंमत जास्त असल्याने अशा वाटपाच्या दस्तनोंदणीची संख्या तुलनेने कमी होती. अनेक शेतकरी दस्तनोंदणी करणे टाळत होते. तरीदेखील राज्यात दरवर्षी २५ लाख दस्तांची नोंदणी केली जाते. त्यात अशा दस्तांची संख्या सुमारे एक ते दीड लाख इतकी असते. हे प्रमाण शहरी भागात कमी असून ग्रामीण भागात जास्त आहे. 

नोंदणी न केल्यामुळे भविष्यात शेत जमिनीवर वाद निर्माण होऊन त्याचा शेतकऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना नाहक त्रास सहन करावा लागत असतो. त्यामुळे अशा दस्तांना नोंदणी शुल्क माफ मंत्रिमंडळाच्या बैठकीत मागील महिन्यात घेतला होता. त्यानुसार याबाबतची अधिसूचना राजपत्रात महसूल विभागाचे सहसचिव सत्यनारायण बजाज यांनी प्रसिद्ध केली आहे. आता अशा दस्तांना नोंदणी शुल्क आकारण्यात येणार नाही. मात्र, राज्य सरकारच्या पूर्वीच्या अधिसूचनेनुसार नोंदणी शुल्क माफ असले तरी किमान १०० रुपये मुद्रांक शुल्क आकारावे असे निर्देश दुय्यम निबंधकांना देण्यात आले आहेत. त्यामुळे असे दस्त केवळ १०० रुपयांत केले जाणार आहेत. यातून शेतकऱ्यांची मोठी आर्थिक बचत होणार आहे. या निर्णयामुळे सरकारच्या महसुलात दरवर्षी ३५ ते ४० कोटी रुपयांची घट येऊ शकते.

दस्तनोंदणी अशी वैकल्पिक असल्याने शेतकऱ्यांचा प्रतिसाद मिळत नव्हता. यामुळे शेतकऱ्यांचा प्रतिसाद वाढून दस्तनोंदणीही वाढेल.  - संतोष हिंगाणे, जिल्हा सहनिबंधक, पुणे शहर

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडAgriculture Schemeकृषी योजनाAgriculture Sectorशेती क्षेत्र