शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
3
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
4
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
5
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
6
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
7
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
8
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
9
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
10
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
11
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
12
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
13
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
14
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
15
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
16
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
17
'सिंघम 3' च्या सेटवरुन अजय देवगण-जॅकी श्रॉफचा फाईट सीन लीक, व्हिडीओ व्हायरल
18
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
19
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
20
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 

'कोरोना योद्धे' म्हणून गौरविलेले डॉक्टर,परिचारिकांकडे वाढते दुर्लक्ष; पुण्यात ससूनच्या परिचारिकांचे आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2020 10:54 AM

‘नव्याचे नऊ दिवस’ म्हण केली प्रशासनाने सार्थ

ठळक मुद्देशासनाने आदेश मागे घेतला नाहीतर १ सप्टेंबरला काळ्या फिती लावून काम करण्याचा इशारा

पुणे :  मराठीत ‘नव्याचे नऊ दिवस’ अशी एक म्हण आहे़ कोणत्याही गोष्टीचे नऊ दिवस कौतुक असते, त्यानंतर त्यांच्याविषयी लोकांचा रस संपून जातो अथवा त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जाते़ अशीच काहीशी परिस्थिती कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या सरकारी डॉक्टर व परिचारिकांची अवस्था शासनाने केली आहे.

कोरोनाचा ससंर्ग वाढू लागला, तसा त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर, परिचारिका यांचा कोरोना युद्धा म्हणून गौरव केला गेला. त्यांच्यावर फुले उधळण्यात आली. सतत संसर्ग होण्याचा धोका असलेल्या या लोकांकडून समाजात व त्यांच्या कुटुंबाला संसर्ग होऊ नये, म्हणून त्यांची हॉटेल, विश्रामगृहात सुरुवातील चांगली सोय केली. मात्र, जेव्हा या हॉटेलची बिल देण्याची वेळ आली. तेव्हा प्रशासनाचा सर्व आदरभाव गळून पडला. त्यातूनच हे डॉक्टर, परिचारिकांकडे दुर्लक्ष होऊ लागले. नव्याचे नऊ दिवस संपल्यावर सर्वांकडूनच या लोकांकडे पाहण्याच्या दृष्टीकोनात बदल होत गेला आहे. आता तर शासनाने परिचारिकांचा विलगीकरणाचे दिवस ७ वरुन ३ वर आणले आहेत. कोरोना रुग्णाच्या संपर्कात असल्यानंतर संबंधितांना ७ दिवसांनंतर लक्षणे दिसून येतात, या निकषाने या परिचारिकांना रुग्ण सेवा देत असताना चुकून संसर्ग झाला असेल तर तो इतरांपर्यंत पसरु नये म्हणून त्यांना ७ दिवसांच्या ड्युटीनंतर ७ दिवस विलगीकरणात राहण्याची तरतुद होती. आता ती ३ दिवसांवर आणली असून तेही त्यांनी घरी राहावे, असे आदेश काढले आहे. 

याबाबत काही परिचारिकांनी सांगितले की, घरी विलगीकरणात राहणे शक्य नाही. त्यातून घरात संसर्ग पसरण्याचा धोका आहे. हॉटेलमध्येही आता त्यांच्याकडे पूर्वीसारखे लक्ष दिले जात नाही. सुरुवातीच्या काळात हॉटेलमध्ये देण्यात येणारे जेवण हे चांगले व पौषिकच असेल, याकडे अधिकारी जातीने लक्ष देत. डॉक्टर, परिचारिकांना आपण सेवा देऊन आपण देशसेवेला हातभार लावत असल्याची हॉटेलचालक, वेटर यांची भावना होती. पण, गेल्या काही दिवसात त्यांच्याही वर्तनात या परिचारिकांना फरक जाणवू लागला आहे. आता प्रशासनाचे जेवणाच्या दर्जाकडे दुर्लक्ष होऊ लागले आहे. कोविड सेंटरमधील जेवणाचा दर्जाही खालावला आहे. हॉटेलमधील कर्मचारीही आता त्यांच्या सोयी सुविधा देण्याकडे दुर्लक्ष करु लागले आहेत.  त्यामुळे आता डॉक्टर, परिचारिका आपल्याला लागणारे खाद्यपदार्थ घरुन मागून घेऊ लागले आहेत.  आता तर प्रशासनाने त्यांनी घरातच विलगीकरणात रहावे, असे आदेश काढले आहेत. नव्याचे नऊ दिवस ही म्हण कोरोना योद्धांच्या बाबतीत प्रशासनाने खरी करुन दाखविली आहे.

टॅग्स :Puneपुणेsasoon hospitalससून हॉस्पिटलcorona virusकोरोना वायरस बातम्या