शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

'कर्मयोगी' समोर शेतकऱ्यांचा आक्रमक पवित्रा; थकीत रक्कम न दिल्याने आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2021 19:34 IST

कारखाना प्रशासन व आंदोलक शेतकरी यांची पोलीस प्रशासनाने बैठक घेऊन कारखान्यांनी थकित उसाची देय रक्कम पंधरा दिवसात देण्याचे आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.

कळस : इंदापूर येथील कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्यामध्ये गेल्या हंगामातील ऊस बिलाची रक्कम न मिळाल्यामुळे शेतकर्‍यांनी आक्रमक पवित्रा धारण करत काटा बंद आंदोलन केले. बिलांची रक्कम दिल्याशिवाय आंदोलन थांबणार नाही अशी भूमिका घेतल्याने मोठा पेच निर्माण झाला. मात्र कारखाना प्रशासन व आंदोलक शेतकरी यांची पोलीस प्रशासनाने बैठक घेऊन कारखान्यांनी थकित उसाची देय रक्कम पंधरा दिवसात देण्याचे आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.  

इंदापूर, कर्जत, माढा, करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी यामध्ये सहभाग घेतला. काही शेतक-यांनी आक्रमक पवित्रा घेत काटा बंद केला. ऊसाचे पहिले बिल तसेच एफआरपी न दिल्याने आंदोलन करण्यात आले. मागणी अर्ज करूनही त्याची दखल घेतली जात नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. तर निर्णय झाल्याशिवाय आम्ही आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका शेतकऱ्यांनी घेतली होती. 

काही शेतकऱ्यांना उसाच्या रकमेचे चेक देण्यात आले होते. मात्र रक्कम नसल्याने चेक बाऊन्स झाल्याचे शेतकर्‍यांनी सांगितले. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ऊस बिलाची रक्कम कारखान्याचा गाळपाचा दुसरा हंगाम सुरू झाला तरी न मिळाल्याने अखेर शेतकऱ्यांच्या रागाचा उद्रेक झाला. यावेळी शेतकऱ्यांनी आपल्या कुटुंबातील व्यक्तींच्या आजारपणासाठी पैसे नसल्याचे सांगितले.

त्यामुळे नुकत्याच कारखान्याच्या बिनविरोध निवडून आलेल्या संचालक मंडळासमोर मोठे आव्हान निर्माण झाले होते. कारखान्याने एफआरपीची उर्वरित रक्कम तसेच पहिल्या हप्ताची राहिलेली रक्कम दिवाळीपूर्वी सोडणे गरजेचे होते. मात्र आर्थिक अडचणीमुळे विलंब झाल्याने  शेतकर्‍यांनी सहनशीलता संपल्याने उद्रेक झाला. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तयुब मुजावर यांनी कारखाना प्रशासन व आंदोलक यांची बैठक घेऊन चर्चा केली. अखेर शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले असून कारखान्यांनी थकित उसाचे देय रक्कम पंधरा दिवसात देण्याचे आश्वासन कार्यकारी संचालक यांनी दिले आहे. 

टॅग्स :IndapurइंदापूरSugar factoryसाखर कारखानेharshvardhan patilहर्षवर्धन पाटीलFarmerशेतकरी