शहरं
Join us  
Trending Stories
1
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
2
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
3
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
4
"...तेव्हा हेच नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये चालले होते, मी त्यांना ठाकरेंच्या सांगण्यावरून रोखलं", राजन विचारेंचा धक्कादायक दावा
5
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
6
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
7
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
8
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
9
‘राहुल गांधी ग्रेट पॉलिटिकल सायंटिस्ट’! हिमंता बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल, पण असं का म्हणाले?
10
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
11
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
12
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
13
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
14
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
15
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
16
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
17
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
18
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
19
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
20
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई

नॅक मूल्यांकन बदलाचा ‘एजन्सीज’फायदा; शैक्षणिक संस्थांवर पडणार आर्थिक बोजा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2017 6:58 PM

विद्यापीठ व महाविद्यालयांची नॅक मूल्यांकनाची प्रक्रिया पूर्वीपेक्षा अधिक  किचकट झाली आहे. यामुळे शैक्षणिक संस्थांना मोठा आर्थिक बोजा सहन करावा लागणार आहे.

ठळक मुद्दे१ नोव्हेंबरपासून नॅककडून मूल्यांकनाची प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात येणारआवश्यक पल्बिकेशन, सायटेशन, एचइंडेक्स यासारखी माहिती मिळवून देण्यासाठी खासजी एजन्सीज काम करतात.

पुणे : विद्यापीठ व महाविद्यालयांची नॅक मूल्यांकनाची प्रक्रिया पूर्वीपेक्षा अधिक  किचकट झाली आहे. त्यामुळे मूल्यांकनाच्या प्रक्रियेसाठी पैसे घेवून मदत करणार्‍या खासगी एजन्सीज्ला पुढील काळात चांगले दिवस येणार आहेत. मात्र, त्यामुळे शैक्षणिक संस्थांना मोठा आर्थिक बोजा सहन करावा लागणार आहे.नॅशनल असेसमेंट अ‍ॅण्ड अ‍ॅक्रिडिटेशन कौन्सिलने (नॅक) मूल्यांकन प्रक्रियेत बदल केले असून येत्या १ नोव्हेंबरपासून नॅककडून मूल्यांकनाची प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. गेल्या काही वर्षांपासून नॅक मूल्यांकनाला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. तसेच नवीन विद्यापीठ कायद्यात नॅक मूल्यांकन करून न घेणार्‍या महाविद्यालयांची संलग्नता काढून घेण्याबाबतची तरतूद करण्यात आली आहे. परिणामी आत्तापर्यंत नॅककडे दुर्लक्ष केलेल्या महाविद्यालयांना मुल्यांकन करून घेणे क्रमप्राप्त ठरणार आहे. त्यामुळे नॅक मूल्यांकनासाठी व एनआयआरएफ रॅकिंगच्या कामात मदत करणार्‍या ‘खासगी एजन्सीज्’चा फायदा होणार आहे.महाविद्यालय सुरू करून पाच किंवा त्यापेक्षा अधिक कालावधी झालेल्या महाविद्यालयांना नॅक करून घेभे बंधनकारक आहे. मात्र, बहुतांश ग्रामीण भागातील व नुकत्याच सुरू झालेल्या महाविद्यालयांना नॅक मूल्यांकनाच्या प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी अडचणी येतात. यामुळेच अनेक महाविद्यालयांनी अद्याप नॅककडून मूल्यांकन करून घेतलेले नाही. त्यात आता मूल्यांकनाची प्रक्रिया पूर्वीपेक्षा किचकट झाली आहे. त्यामुळे मुल्यांकन प्रक्रियेच्या कामातील तज्ज्ञांची मदत घेतल्याशिवाय या महाविद्यालयांपुढे पर्याय उरणार नाही.विद्यापीठ व महाविद्यालयाच्या इंटरनल क्वालिटी असेसमेंट सेल (आयक्यूएसी) मधील पदाधिकार्‍यांच्या मदतीने नॅक मूल्यांकनाचे काम केले जाते. मात्र, नॅककडून मागविण्यात आलेली माहिती सहजासहजी उपलब्ध होत नाही. नॅकसाठी संबंधित विद्यापीठ व महाविद्यालयाचे पल्बिकेशन, सायटेशन्स, एचइंडेक्स आदी बाबींची नोंद करावी लागते. ही माहिती मिळवून देण्याचे काम खासगी एजन्सीजकडून केले जाते. त्यातच आॅनलाईन सादर केलेल्या माहितीच्या आधारेच संबंधित शैक्षणिक संस्था मूल्यांकन करून घेण्यास पात्र आहे का? हे नॅककडून ठरविले जाणार आहे. त्यामुळे या क्षेत्रात गुणवत्तापूर्ण काम करणार्‍या एजन्सीजला चांगले दिवस येणार आहेत. 

नॅकसाठी आवश्यक पल्बिकेशन, सायटेशन, एचइंडेक्स यासारखी माहिती मिळवून देण्यासाठी खासजी एजन्सीज काम करतात. त्यात नॅक मूल्यांकनाची प्रक्रिया बदलली असून ती समजून घेण्यासाठी काही कालावधी द्यावा लागणार आहे. त्यामुळे नॅक मूल्यांकनाच्या क्षेत्रात काम करणार्‍या खासगी एजन्सीजचा नक्कीच फायदा होणार आहे.- डॉ. प्रफुल्ल पवार, प्रमुख, आयक्यूएसी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ 

टॅग्स :collegeमहाविद्यालयPuneपुणे