पत्नीवर वार करून फरार आरोपी ३ महिन्यांनंतर लोणीकंद पोलिसांच्या जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2017 17:20 IST2017-11-02T17:19:01+5:302017-11-02T17:20:52+5:30

पत्नीवर वार करून जिवे मारण्याचा प्रयत्न करून तीन महिने फरार आरोपीस पकडण्यात पोलिसांना यश आले आहे.     

After three months, the absconding accused in the custody of the Lonikand police | पत्नीवर वार करून फरार आरोपी ३ महिन्यांनंतर लोणीकंद पोलिसांच्या जाळ्यात

पत्नीवर वार करून फरार आरोपी ३ महिन्यांनंतर लोणीकंद पोलिसांच्या जाळ्यात

आव्हाळवाडी : पत्नीवर वार करून जिवे मारण्याचा प्रयत्न करून तीन महिने फरार आरोपीस पकडण्यात पोलिसांना यश आले आहे.     
भानुदास शिवाजी सातव (वय ३३, रा. आव्हाळवाडी, ता. हवेली) असे त्या आरोपीचे नाव आहे.  तो पुणेस्टेशन भागात आल्याची माहिती पोलीस उप. निरीक्षक यू. एन. सस्ते यांना खबºयांमार्फत मिळाली होती. त्यानंतर पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार संतोष कुलथे, पोलीस नायक शेंडे व मार्शलचे बिट पोलीस हवालदार दांडगे, पोलीस हवालदार धोपरे यांनी पुणे स्टेशन येथे सापळा लावून गुरुवारी दुपारी पकडण्यात आले. तीन महिन्यांपासून आरोपी फरार झाला होता. लोणीकंद पोलीसस्टेशन त्याच्या शोधात होते.  
त्याच्यावर भा. दं.वि.कलम ३०७, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंतु तो पोलिसांना गुंगारा देत होता. अखेर पोलिसांनी पकडले. 
 

Web Title: After three months, the absconding accused in the custody of the Lonikand police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.