शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

"तुम्ही हातात कोयता घेऊन तर दाखवा मग आम्ही बघतो", माथेफिरूंना पोलिसांचा सज्जड इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2023 15:30 IST

सदाशिव पेठेतील घटनेनंतर पुणे पोलीस खडबडून जागे; बीट मार्शल, दामिनी पथके वाढवणार, पोलीस आयुक्तांचा निर्णय

पुणे : प्रेमसंबंधात ब्रेकअप केल्याच्या कारणावरून तरुणीवर भर दिवसा एका माथेफिरूने कोयत्याने प्राणघातक हल्ला केल्याच्या घटनेनंतर संपूर्ण शहर पोलिस दल खडबडून जागे झाले. महाविद्यालयीन विद्यार्थिनी, महिलांच्या सुरक्षेसाठी दामिनी पथकांची गस्त वाढविण्यात येणार असून, बीट मार्शलची संख्या वाढवली जाणार असल्याचे पोलिस आयुक्त रितेशकुमार यांनी सांगितले. तर आता पुण्यात कोयता घेऊन फिरणाऱ्यांचे प्रमाणही वाढत चालले आहे. अशा माथेफिरूंना तुम्ही हातात कोयता घेऊन तर दाखवा मग आम्ही बघतो असा सज्जड इशारा पोलीस उपायुक्त संदीप सिंग गिल यांनी दिला आहे. 

तरुणीवर झालेल्या हल्ल्याच्या वृत्तानंतर संपूर्ण राज्यभरातून त्यावर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. तरुणांनी या तरुणीचा जीव वाचवून तिला पेरुगेट पोलिस चौकीत आणल्यानंतर तेथे कोणीही पोलिस नव्हते. तेथे ड्युटीवर असलेले दोन्ही पोलिस कर्मचारी नव्हते. घटनास्थळी पोलिसांना पोहोचण्यास उशीर झाल्याने पोलिसांवर टीका होऊ लागली.

या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्त रितेशकुमार यांनी सांगितले की, दामिनी पथकात सध्या १५ दामिनी पथके आहेत. त्यांची संख्या २५ करण्यात आली आहे. एका दुचाकीवर दोन महिला कर्मचारी गस्त घालणार आहेत. शाळा, महाविद्यालये, महत्त्वाचे चौक, गर्दीच्या परिसरात गस्त वाढविण्यात येणार आहे. तसेच सकाळ आणि सायंकाळी अशा दोन सत्रामध्ये १०० बीट मार्शल तैनात करण्यात येणार आहेत.

घटनेत त्या माथेफिरूने बॅगेमधून कोयता आणला होता. त्यामुळे पोलिसांकडून नाकाबंदी दरम्यान अशा प्रकारच्या बॅगा, संशयित व्यक्तींची देखील तपासणी करण्यात येणार आहे. पोलिस चौकीमध्ये पोलिस नसल्याची वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेतली. एरवी रात्रीच्या वेळी बंद असलेल्या पोलिस चौक्या मंगळवारी रात्री उघड्या असल्याचे दिसून आले.

तरुणाईच्या समुपदेशनावर भर..

प्रेमप्रकरणावरून तरुणींना टार्गेट करण्याच्या घटना घडत आहे. त्यामुळे पोलिसांनी याबाबत महाविद्यालयीन स्तरावर तरुणाईचे समुपदेशन करण्याचे ठरविले आहे.

शाळा, महाविद्यालयात तक्रार बॉक्स 

अनेकदा घाबरून तरुणी बोलण्यास अथवा तक्रार करण्यास पुढे येत नाही. त्यामुळे सर्व शाळा, महाविद्यालयात पूर्वीप्रमाणे तक्रार पेटी ठेवण्याच्या सूचना पोलिस आयुक्तांनी दिल्या आहेत. प्रत्येक दोन दिवसाला या पेटीची दखल घेतली जाणार आहे.

तक्रारींसाठी ड्रॉपबॉक्स बसविण्यात येणार

शहरात पोलिसांची गस्त वाढविण्यात येणार असून, यासाठी दामिनी पथक, बीट मार्शल वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, शाळा, महाविद्यालये येथे तक्रारींसाठी ड्रॉपबॉक्स बसविण्यात येणार आहेत. वेळोवेळी स्थानिक पोलिसांकडून याची तपासणी होईल. - रितेश कुमार, पोलिस आयुक्त, पुणे शहर.

 

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसsadashiv pethसदाशिव पेठCrime Newsगुन्हेगारीWomenमहिला