शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Sant Tukaram Maharaj Palkhi 2025: संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे प्रस्थान झाल्यानंतर चिंचोलीत विसावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 10:24 IST

चिंचोली ग्रामस्थांनी वारकऱ्यांच्या निवास, आंघोळ, नाश्ता, भोजन आणि विश्रांतीची व्यवस्था केली आहे

देहूरोड : संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे बुधवारी श्रीक्षेत्र देहूतून प्रस्थान झाल्यानंतर, वारी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या अनेक दिंड्यांना देहू परिसरात मुक्कामासाठी जागा उपलब्ध न झाल्याने त्या चिंचोली आणि झेंडेमळा परिसरात येत आहेत. देहूरोड कॅन्टोन्मेंट प्रशासन आणि स्थानिक ग्रामस्थांकडून वारकऱ्यांच्या स्वागतासाठी आणि भोजन व्यवस्थेसाठी तयारी सुरू आहे.

चिंचोलीत शनी-पादुका मंदिर परिसरात विसावा

रविवारी पालखी चिंचोलीतील शनी-पादुका मंदिराजवळ दुपारच्या विसाव्यासाठी थांबणार आहे. त्या ठिकाणी दर्शन व्यवस्था, स्वच्छता, वीजपुरवठा आणि इतर आवश्यक सुविधा पूर्ण करण्यात आल्या आहेत. देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या वतीने चिंचोली येथील विसाव्याच्या ठिकाणासह आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली आहे. तसेच देहूरोड लष्करी भाग, मोकळे गायरान, खेळाची मैदाने, झेंडेमळा, अशोकनगर आणि महामार्गालगत गवत, झाडाझुडपं आणि अडथळा ठरणाऱ्या फांद्या हटवल्या आहेत. रस्त्याच्या बाजूला पडलेला राडारोडादेखील साफ करण्यात आला आहे. पालखी मार्ग सुशोभित आणि व्यवस्थित करण्यात आला आहे.

ग्रामस्थांकडून वारकऱ्यांच्या सेवेसाठी पुढाकार

चिंचोली ग्रामस्थांनी वारकऱ्यांच्या निवास, आंघोळ, नाश्ता, भोजन आणि विश्रांतीची व्यवस्था केली आहे. काही कुटुंबांनी आपली घरे वारकऱ्यांसाठी खुली केली असून, कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये यासाठी ग्रामस्थ सतर्क आहेत. संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर देहूरोड, चिंचोली आणि झेंडेमळा परिसरात वारकऱ्यांच्या स्वागतासाठी सज्जता पूर्ण झाली आहे. स्थानिक प्रशासन, ग्रामस्थ आणि स्वयंसेवी संस्था मिळून वारीची परंपरा, स्वच्छता आणि सेवा यांचे उत्तम उदाहरण सादर करत आहेत.

टॅग्स :PuneपुणेSant Tukaram Maharaj palkhi Sohalaसंत तुकाराम महाराज पालखी सोहळाashadhi wariआषाढी एकादशी वारी 2025Ashadhi Ekadashiआषाढी एकादशी २०२५Pandharpurपंढरपूरsant dnyaneshwarसंत ज्ञानेश्वर