सहा वर्षानंतर दोघांना जन्मठेप
By Admin | Updated: October 19, 2014 01:38 IST2014-10-19T01:38:01+5:302014-10-19T01:38:01+5:30
संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या महाराष्ट्र केसरी संजय पाटील खून खटल्याचा निकाल शनिवारी जाहीर झाला.

सहा वर्षानंतर दोघांना जन्मठेप
सातारा : संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या महाराष्ट्र केसरी संजय पाटील खून खटल्याचा निकाल शनिवारी जाहीर झाला. त्यामध्ये आरोपी सागर बाबू परमार (28) आणि हमीद रहिम शेख (29) या दोघांना तिसरे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश ए.पी. रघुवंशी यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. दरम्यान, या खटल्यात आमदार विलासराव पाटील-उंडाळकर यांचे पुत्र अॅड. उदयसिंह पाटील व सल्या चेप्यासह नऊ जणांची निदरेष मुक्तता करण्यात आली. पावणोसहा वर्षानंतर या खटल्याचा निकाल लागला.
या खटल्याची पाश्र्वभूमी अशी, 15 जानेवारी 2क्क्9 रोजी महाराष्ट्र केसरी संजय पाटील हे सहकार्यासमवेत क:हाड येथील हॉटेल शिवदर्शनमधून चहा पिऊन बाहेर येत होते. त्याचवेळी दोन युवकांनी गोळ्या झाडून त्यांची हत्या केली होती.
या प्रकरणी क:हाड शहर पोलिसांत दोन अज्ञात युवकांवर गुन्हा दाखल झाला होता. मात्र, काही दिवसांतच पोलिसांनी या प्रकरणातील सर्व संशयित 11 आरोपींना अटक केली होती. त्यामध्ये विलासराव पाटील-उंडाळकर याचे चिरंजीव अॅड. उदयसिंह यांचाही समावेश होता. खटल्याच्या सुनावणीदरम्यान एकूण 65 साक्षीदार तपासण्यात आले. तसेच अण्णा गावडे, हणमंत पवार, बाबासाहेब पाटील या तीन प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांसह 17 साक्षीदार फितूर झाले. न्यायालयापुढे आलेले पुरावे आणि साक्षी ग्राह्य
मानून न्यायाधीशांनी सागर परमार आणि हमीद शेखला जन्मठेप आणि
5 हजार रुपये दंड, दंड न भरल्यास
1 वर्ष सक्तमजुरीची शिक्षा
सुनावली़ (प्रतिनिधी)
न्यायाधीशांचे पोलिसांवर ताशेरे
च्‘अतिरिक्त पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी अनावश्यक जादा तपास करण्याचा फार्स केला. पोलीस निरीक्षक संभाजी पाटील यांनी केलेला तपास न्यायाधीशांनी स्वीकारला. उदयसिंह पाटील यांना राजकीय असुयेपोटी गोवण्यात आले आहे.
च्जादा तपास म्हणजे उशिरा सुचलेले शहाणपण आहे. आणि राजकीय द्वेषापोटीच उदयसिंहांना अडकविण्यात आले आहे, अशा प्रकारे न्यायाधीशांनी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढले,’ अशी माहिती बचाव पक्षाचे वकील धैर्यशील पाटील यांनी दिली.