शहरं
Join us  
Trending Stories
1
दहावीत यंदाही मुलींनीच मारली बाजी; पण २ लाख मुली दहावीपर्यंत पोहोचल्याच नाहीत!
2
आजचे राशीभविष्य - 28 मे 2024; कुटुंबियांसोबत मतभेद संभवतात, आर्थिक देवाण-घेवाण अथवा गुंतवणूक करताना सावध रहा
3
महाराष्ट्रासह विविध राज्यांत राष्ट्रीय तपास संस्थेची कारवाई; मानवी तस्करीप्रकरणी पाच जणांना अटक
4
दीड वर्षाच्या बाळाची जन्मदात्यांनीच केली विक्री; साडेचार लाखांचा सौदा, सहा जणांना अटक
5
दहावी निकाल: मुंबई विभागाचा टक्का वधारला; दोन टक्क्यांनी झाली वाढ, उत्तीर्णतेत मुलींची सरशी
6
समृद्धीचा शेवटचा टप्पा ऑगस्टमध्ये खुला होणार; MSRDC कडून शेवटच्या टप्प्यातील कामे सुरू
7
दहावी निकाल: मुंबई विभागात ८ विद्यार्थ्यांना १०० % गुण; ९० टक्के मिळविणाऱ्यांचे प्रमाणही वाढले
8
ससूनच्या डॉक्टरांनी ३ लाखांसाठी बदलले ‘बाळा’च्या रक्ताचे नमुने; दोन्ही डॉक्टरांना अटक
9
ताज हॉटेल अन् विमानतळ बॉम्बने उडवणार; मुंबई पोलिसांना आला धमकीचा फोन
10
'अब की बार...४०० पार' घोषणेचा निवडणुकीत फटका बसला; भुजबळांनी जाहीरपणे दिली कबुली
11
"4 जूनला आमचे सरकार येणार अन् 5 जुलैला तुमच्या खात्यात 8500 रुपये टाकणार"- राहुल गांधी
12
"आम्ही पाठिंबा दिला होता, त्यामुळे..."; निवडणूक संपताच महाविकास आघाडीत फूट?
13
विभव कुमार यांचे सर्व युक्तिवाद निष्फळ, स्वाती मालिवार मारहाण प्रकरणी जामीन अर्ज फेटाळला
14
‘‘हिट अँड रन’ प्रकरणात महायुतीतील सत्ताधारी आमदार- मंत्री आरोपींचे ‘गॉडफादर‘,’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
15
विधानसभेत भाजपा किती जागा लढवणार, मित्रपक्षांना काय देणार? भुजबळांच्या दाव्यानंतर फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
16
Fact Check: राहुल आणि सोनिया गांधींच्या सेल्फीमध्ये येशू ख्रिस्ताचा फोटो नाही
17
किमान आता तरी कोणती कारणं सांगू नका; वसीम अक्रमने भारतीय खेळाडूंची उडवली खिल्ली
18
विरोधक पुन्हा एकवटणार, 1 जून रोजी INDIA आघाडाची दिल्लीत बैठक, जाणून घ्या कारण...
19
Hardik Pandya नक्की कुठेय? टीम इंडियासोबत USA ला गेला नाही; मोठी अपडेट समोर
20
फोन जप्त करून राजीनामा घ्या; दमानियांचा हल्लाबोल: खुलासा करत अजित पवार म्हणाले...

मॉन्सूनच्या दीड महिन्यानंतरही अर्धा भारत पावसाच्या प्रतीक्षेत

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2019 7:58 AM

मॉन्सूनच्या आगमनाची संपूर्ण देशभरातून चातकासारखी वाट पाहिली जाते, त्या देवभूमीकडे पावसाने पाठ फिरविली आहे. दीड महिना सरल्यानंतरही देशातील निम्म्या भुभागावर पाऊस कमी झाला आहे़

ठळक मुद्देकेरळ, झारखंडमध्ये सर्वांत कमी पाऊस : ७१ जिल्ह्यांकडे पावसाची पाठ

विवेक भुसेपुणे : मॉन्सूनच्या आगमनाची संपूर्ण देशभरातून चातकासारखी वाट पाहिली जाते, त्या देवभूमीकडे पावसाने पाठ फिरविली आहे. दीड महिना सरल्यानंतरही देशातील निम्म्या भुभागावर पाऊस कमी झाला आहे़. ७१ जिल्ह्यांमध्ये पाऊस अत्यंत कमी पडला असल्याने तेथे दुष्काळाचे सावट आताच दिसू लागले आहे़ देशातील २८० जिल्ह्यात कमी पाऊस झाला आहे़.

मॉन्सूनचे आगमन यंदा उशीर झाल्याने जून महिन्यात सर्वत्र पाऊस कमी झाला होता़ पण, जुलैचा अर्धा महिना सरला तरी काही भाग वगळता देशभरात पावसाचे प्रमाण सर्वत्र कमी आहे़ १५ जुलैपर्यंत मॉन्सून संपूर्ण भारत व्यापतो़ यंदा उशीरा येऊनही मॉन्सूनने राजस्थान, पंजाबचा काही भाग सोडला तर संपूर्ण देश व्यापल्याचे हवामान विभागाने जाहीर केले तरी पावसाचे प्रमाण मात्र कमी आहे़ सध्या मॉन्सून ईशान्यकडील राज्यांमध्ये सक्रीय आहे़ १ जून ते १५ जुलैपर्यंत हवामान विभागाचे ३६ विभागापैकी केवळ २ विभागात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे़ त्याचे एकूण क्षेत्र हे देशाच्या केवळ ५ टक्के इतके आहे़ सरासरीपेक्षा १९ अधिक  ते  १९ टक्के कमी पाऊस १५ विभागात पडला असून त्यात देशातील ४४ टक्के भुभागाचा समावेश होतो़ तर १९ हवामान विभागात (-५९ ते -२० टक्के) पावसाचे प्रमाण अत्यंत कमी आहे़ त्यात देशातील ५१ टक्के भुभाग येतो़.

मॉन्सूनचे आगमन सर्वप्रथम केरळ राज्यात होते़ यंदा मात्र केरळमधील १४ जिल्ह्यांपैकी १३ जिल्ह्यांमध्ये कमी पाऊस पडला असून एक जिल्ह्यामध्ये अत्यंत कमी पाऊस झाला आहे़ केरळमध्ये १५ जुलैपर्यंत सर्वसाधारण १ हजार मिमी पाऊस पडतो़ .यंदा मात्र जवळपास निम्माच पाऊस आतापर्यंत झाला़ झारखंडमधील २४ जिल्ह्यांपैकी २० जिल्ह्यांमध्ये कमी तर १ जिल्ह्यात सर्वात कमी पावसाची नोंद झाली आहे़. आंध्र प्रदेशातील १३ पैकी १० जिल्हे, तेलंगणातील ३१ पैकी २३ जिल्ह्यात कमी पाऊस आहे़. एका बाजूला पंजाबातील जोरदार पाऊस असताना दिल्लीत आतापर्यंत केवळ ९ टक्के पाऊस झाला आहे़. त्याच्या शेजारील हरियानामधील २१ जिल्ह्यांपैकी १४ जिल्ह्यांमध्ये ४० टक्क्यांहून कमी पाऊस झाला असून ४ जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस नोंदविला गेला आहे़. तेलंगणा हा मराठवाड्याप्रमाणेच पर्जन्य छायेच्या प्रदेशात मोडणारा भुभाग़ तेथील २१ जिल्ह्यांपैकी २३ जिल्ह्यांमध्ये ५९ ते २० टक्के कमी पाऊस पडला असून २ जिल्ह्यांमध्ये ४० टक्क्यांहून कमी पाऊस झाला आहे़ एका बाजूला मॉन्सूनचे उशीरा झालेले आगमन व अरबी समुद्र व पश्चिम बंगालच्या उपसागरात आतापर्यंत केवळ एकदाच कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले़ या आठवड्यात पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता नाही़. 

टॅग्स :droughtदुष्काळRainपाऊसFarmerशेतकरी