पत्नीचा खून करून तो हजर झाला ठाण्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2018 07:02 IST2018-02-20T07:02:26+5:302018-02-20T07:02:36+5:30

चारित्र्याच्या संशयावरून त्याने आपल्या पत्नीचा गळा आवळून खून केला व त्यानंतर स्वत: बंडगार्डन पोलीस ठाण्यात जाऊन आपण खून केल्याचे सांगितले़

After killing his wife, he came in Thane | पत्नीचा खून करून तो हजर झाला ठाण्यात

पत्नीचा खून करून तो हजर झाला ठाण्यात

पुणे : चारित्र्याच्या संशयावरून त्याने आपल्या पत्नीचा गळा आवळून खून केला व त्यानंतर स्वत: बंडगार्डन पोलीस ठाण्यात जाऊन आपण खून केल्याचे सांगितले़
मलयकुमार सिंह (वय ३५, रा़ रावळपाडा, दहिसर, मुंबई) असे त्याचे नाव आहे़ दीपा आस्वारे ऊर्फ सिंह (वय २६) असे खून केलेल्या विवाहितेचे नाव आहे़ ते मुंबईचे राहणारे असून, पुण्यात येऊन त्याने हॉटेल सुयशमध्ये रविवारी दुपारी ४ वाजता हा प्रकार केला़
याप्रकरणी पोलिसांनी सांगितले की, मलयकुमार सिंह आणि दीपा यांचा २०१६ मध्ये प्रेमविवाह झाला होता़ मलयकुमार हा एम्ब्रॉडरीचे काम करतो़ दीपा ही मूळची पुण्याची आहे़ शनिवारी रात्री ते मुंबईहून येऊन सोमवार पेठेतील हॉटेल सुयशमधील रुम नंबर २०१ मध्ये उतरले होते़ दोघेही दिवसभर रूममध्येच होते़ त्यानंतर मलयकुमार दुपारी ४ वाजल्यानंतर रूम बंद करुन बाहेर पडला़ जाताना त्याने हॉटेलच्या मॅनेजरला पत्नीचा मारले असून तो थेट बंडगार्डन पोलीस ठाण्यात दाखल झाला़ त्याने आपण पत्नीचा गळा दाबून खून केल्याचे तेथे असलेल्या पोलिसांना सांगितले़ तेथील पोलिसांनी ही माहिती तातडीने समर्थ पोलिसांना कळविली़ पोलीस त्याला घेऊन हॉटेलमध्ये आले़
चारित्र्याच्या संशयावरून दीपा हिचा गळा दाबून खून केला होता़ सहायक पोलीस आयुक्त जयश्री गायकवाड, समर्थ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोहिते यांनी घटनास्थळाला भेट दिली़

Web Title: After killing his wife, he came in Thane