शिवविचारांनी राज्याला फडणवीस पुढे नेतील  

By राजू इनामदार | Updated: February 19, 2025 19:29 IST2025-02-19T19:27:43+5:302025-02-19T19:29:42+5:30

शिवछत्रपतींच्या अश्वारूढ पुतळ्याजवळ शिवरायांचा पाळणा व पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

After becoming the Chief Minister, he will lead the state on the path of progress with Shiv thoughts - Founder President Vikas Pasalkar on behalf of the All India Shiv Mahotsav Committee | शिवविचारांनी राज्याला फडणवीस पुढे नेतील  

शिवविचारांनी राज्याला फडणवीस पुढे नेतील  

पुणे : मुख्यमंत्री होण्याआधी किल्ले रायगडावर जाऊन देवेंद्र फडणवीस यांनी शिवरायांच्या समाधीचे दर्शन घेतले होते. आता मुख्यमंत्री झाल्यावर ते शिवविचारांनी राज्याला प्रगतीपथावर नेतील अशी भावना अखिल भारतीय शिवमहोत्सव समितीच्या वतीने संस्थापक अध्यक्ष विकास पासलकर यांनी फडणवीस यांच्यासमोरच व्यक्त केली.

समितीच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही जगातील पहिले शिवस्मारक असलेल्या एसएसपीएम संस्थेच्या आवारातील शिवछत्रपतींच्या अश्वारूढ पुतळ्याजवळ शिवरायांचा पाळणा व पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. शिवपुतळ्याच्या दर्शनासाठी तिथे आलेल्या फडणवीस यांची उपस्थिती समितीच्या कार्यक्रमाला लाभली. फडणवीस यांनी समितीच्या उपक्रमांना शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या. समितीच्या वतीने पासलकर यांनी त्यांचे स्वागत केले. केंद्रीय मंत्री मनसुख मांडवीय, क्रीडा मंत्री दत्ता दत्ता भरणे, केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे ,मंत्री चंद्रकांत पाटील, आशिष शेलार, खासदार मेधा कुलकर्णी, आमदार सिद्धार्थ शिरोळे, संजीव नाईक निंबाळकर उपस्थित होते.

रायगड विकास प्राधिकरणाचे मार्गदर्शक, माजी विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी शिवजन्मभूमी किल्ले शिवनेरी व शिवतीर्थ किल्ले रायगड याच्या विकासासाठी कार्य करता आले ही आयुष्याची मोठी पूंजी असल्याची भावना व्यक्त केली. समितीच्या साधना पासलकर, सोनाली धुमाळ, मिना बराटे, पूजा झोळे, स्नेहल पायगुडे यांनी पालखीला खांदा दिला. प्रशांत धुमाळ यांनी सूत्रसंचालन केले. विराज तावरे यांनी आभार व्यक्त केले. कैलास वडघुले, मंदार बहिरट, नीलेश इंगवले, अक्षय रणपिसे, सतीश शेलार यांनी संयोजन केले.

Web Title: After becoming the Chief Minister, he will lead the state on the path of progress with Shiv thoughts - Founder President Vikas Pasalkar on behalf of the All India Shiv Mahotsav Committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.