शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

बँकेच्या पत्रानंतर सायबर चोरट्यांच्या Sms मधील लिंकवर क्लिक करणं पडलं महागात; अडीच लाखांना गंडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2021 15:30 IST

सायबर चोरट्यांना नवा फंडा....

पुणे : बँकेकडून केवायसी अपडेट करण्याचे पत्र आल्यानंतर त्यांच्या मोबाईलवर एक मेसेज आला. तो बँकेकडून आल्याचे समजून महिलेने त्यावरील लिंक ओपन करताच त्यांच्या बँक खात्यातून सायबर चोरट्यांनी अडीच लाख रुपये ऑनलाईन गंडा घातला. 

याप्रकरणी विमाननगर येथील एका ४२ वर्षाच्या महिलेने विमाननगर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. ही घटना ७ जून रोजी ऑनलाईन घडली.

या महिलेचे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या हडपसर येथील शाखेत बचत खाते आहे. यापूर्वी त्यांना बँकेकडून केवायसी अपडेट करण्याबाबत रजिस्टर पोस्टामार्फत पत्र आले होते. त्यानंतर त्यांना एका मोबाईल क्रमांकावरुन त्यांना मेसेज आला. त्यात तुमचे स्टेट बँक ऑफ इंडियाचे अकाऊंट सस्पेंड केले आहे. खालील लिंक करुन तुमचे केवायसी व्हेरिफिकेशन पुन्हा करा, असे सांगून त्यात एक लिंक दिली होती. बँकेचे पोस्टाने आलेले पत्र आणि आताचा मेसेज पाहिल्यावर या महिलेला हा मेसेज बँकेनेच पाठविला असल्याचा समज झाला. त्यानंतर तिने दिलेली लिंक ओपन केली. लिंक ओपन करताच तिच्या अकाऊंटवरुन कोणीतरी १४ वेळा ऑनलाईन व्यवहार करुन २ लाख ५० हजार ५५८ रुपये काढून घेऊन फसवणूक केली. सावधान, बँक कधीही पत्र पाठवत नाही

यापूर्वी बँकेतून बोलत असल्याचे सांगून सायबर चोरटे लोकांच्या बँक खात्याची गोपनीय माहिती विचारुन त्यांना गंडा घालत होते. तेव्हा बँकांकडून सातत्याने जनजागृती करुन बँकेकडून कोणत्याही बाबतीत ग्राहकांना फोन करुन माहिती विचारली जात नाही, असे सांगितले गेले. त्याचा परिणाम आता अशाप्रकारचे फसवणुक होण्याचे प्रमाण जवळपास बंद झाले होते. त्यावर आता सायबर चोरट्यांनी नवा फंडा काढलेला दिसून येत आहे. बँकेसारखेच पत्र तयार करुन अगोदर बँकेच्या ग्राहकांना घरी पत्र पाठवायचे आणि त्यानंतर मेसेज पाठवू लागले आहेत. बँकेचे पत्र आले असल्याने त्यांना मेसेज खरा वाटून ते आलेली लिंक उघडून पाहू लागले आहेत. बँक कोणत्याही कारणासाठी ग्राहकाला घरी पत्र पाठवत नाही. हे नागरिकांनी लक्षात घ्यावे, असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.

टॅग्स :Puneपुणेcyber crimeसायबर क्राइमPoliceपोलिसfraudधोकेबाजीonlineऑनलाइनbankबँक