Madhuri Misal: तब्बल २ दिवसांनी परिवहन राज्यमंत्री मिसाळ अखेर स्वारगेट बसस्थानकात

By राजू इनामदार | Updated: March 1, 2025 15:11 IST2025-03-01T15:10:18+5:302025-03-01T15:11:18+5:30

महिला सुरक्षारक्षक स्वारगेटमध्ये दिसत नाही, त्या असणे गरजेचे आहे

After almost 2 days Minister of State for Transport madhuri misal finally arrived at Swargate bus stand | Madhuri Misal: तब्बल २ दिवसांनी परिवहन राज्यमंत्री मिसाळ अखेर स्वारगेट बसस्थानकात

Madhuri Misal: तब्बल २ दिवसांनी परिवहन राज्यमंत्री मिसाळ अखेर स्वारगेट बसस्थानकात

पुणे: स्वारगेट बसस्थानकातील बलात्कार प्रकरण घडून त्यातील आरोपीला अटक झाल्यानंतर तब्बल दोन दिवसांनी परिवहन राज्यमंत्री माधुरी मिसाळ अखेर शनिवारी सकाळी बसस्थानकात पोहचल्या. सुरक्षा रक्षक पुरवणाऱ्या एजन्सीची चौकशी करणार असे त्यांनी सांगितलेच शिवाय महामंडळाच्या अधिकाऱ्यांकडून वेळेवर माहिती दिली जात नसल्याची तक्रारही त्यांनी केली. राज्यातील सर्वच बसस्थानकांच्या सुरक्षा व्यवस्थेचे ऑडिट करू असे त्या म्हणाल्या.

घटना उघडकीस आली त्याच दिवशी दिवसभर बसस्थानकाला अनेक राजकीय व्यक्तींनी भेट दिली व तेथील सुरक्षा व्यवस्थेची एकूण अवस्था पाहिल्यानंतर चिंता व्यक्त केली. मात्र त्यादिवशी, त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारीही राज्यमंत्री मिसाळ यांनी स्वारगेट बसस्थानकाला साधी भेटही दिली नव्हती. मात्र याघटनेसंबधी पोलिस आयुक्तांशी संपर्क साधला व त्यात घटनेच्या तपासाविषयी सुचना दिल्या असे त्यांनी पत्रकारांना कळवले. आज शनिवारी सकाळी त्यांनी स्थानकाला भेट दिली.

त्यांनी स्वत:च बसस्थानकातील एकूणच दुरवस्थेविषयी संताप व्यक्त केला. घडलेली घटना निंदनीय आहेत, त्यासंदर्भात पोलिस आता योग्य ती कारवाई करतीलच, मात्र बसस्थानकातील सर्व सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. एसटी महामंडळात सुरक्षा व दक्षता विभाग होता. त्यावर एका आयपीएस अधिकाऱ्याची नियुक्ती असे. आता मागील दोन वर्षांपासून ती नियुक्ती झालेली नाही. ते पदच रद्द केले असल्याचे सांगण्यात येते. याची सविस्तर माहिती घेऊन ते पद पुन्हा कार्यरत होईल यासाठी प्रयत्न करू असे त्यांनी सांगितले. महिला सुरक्षा रक्षक असणे गरजेचे आहे. ते स्वारगेटमध्ये दिसत नाही असेही त्या म्हणाल्या.

स्वारगेट स्थानकात जुन्या बंद पडलेल्या बसेस एका बाजूला लावून ठेवतात. तिथे कसलीही व्यवस्था नाही. केंद्र सरकारने यासंदर्भात बंद पडलेल्या बस स्क्रॅप करण्याची पॅलिसी आणली आहे. त्याची अमलबजावणी करायला हवी. आता एसटी महामंडळातील बंद पडलेल्या बसविषयी कडक धोरण राबवू असे मंत्री मिसाळ यांनी सांगितले. स्थानकातील अधिकाऱ्यांकडून विचारलेली माहिती दिली जात नाही. याबाबतीत सर्वच स्थानकांमधील परिस्थिती सारखीच आहे. याचा संपूर्ण व सविस्तार आढावा लवकरच घेण्यात येईल. एसटी बसस्थानकांवविषयी सर्वात सुरक्षित जागा अशी भावना प्रवाशांमध्ये असते. ती जपण्याचा पुरेपूर प्रयत्न करू असे मंत्री मिसाळ यांनी सांगितले.

Web Title: After almost 2 days Minister of State for Transport madhuri misal finally arrived at Swargate bus stand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.