शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
3
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
4
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
5
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
6
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
7
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
8
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
9
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
10
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
11
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
12
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
13
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
14
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
15
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
16
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
17
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
18
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
19
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल
20
भारताने दाखवले मोठे मन; पाकिस्तानला पुराबाबत केले सतर्क, ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच चर्चा

तब्बल 'तीस' वर्षानंतर संरक्षण दलाचे तिन्ही प्रमुख एनडीएमध्ये आले एकत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2021 16:24 IST

जुन्या आठवणींना दिला उजाळा

ठळक मुद्देप्रबोधिनीसाठी हा एक ऐतिहासिक क्षण

पुणे : तब्बल ३० वर्षांनंतर म्हणजेच १९९१ सालानंतर काल आणि आज असे दोन दिवस भारतीय संरक्षण दलांचे तीनही प्रमुख,  नौदलप्रमुख अॅडमिरल करमबीर सिंग, हवाईदलप्रमुख राकेश कुमार भदौरिया आणि लष्करप्रमुख जनरल एम. एम. नरवणे यांनी खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए), या आपल्या मातृसंस्थेला एकत्र भेट दिली. तिन्ही संरक्षण सेवांचे प्रशिक्षण देणाऱ्या या सुप्रसिद्ध प्रबोधिनीसाठी हा एक ऐतिहासिक क्षण होता. भेटी दरम्यान त्यांनी एनडीएतील प्रशिक्षण सुविधांचा आढावा घेतला.

भारतीय लष्कर, नौदल आणि हवाईदलाच्या प्रमुखांनी, खडकवासला येथील  राष्ट्रीय संरक्षणप्रबोधिनी या आपल्या मातृसंस्थेला 20 आणि 21 ऑगस्टला एकत्र भेट दिली. तिन्ही संरक्षण सेवांचे प्रशिक्षण देणाऱ्या या सुप्रसिद्ध प्रबोधिनीसाठी हा एक ऐतिहासिक क्षण होता. देशाच्या तिन्ही संरक्षण दलांच्या प्रमुखपदाची जबाबदारी सांभाळणारे तीन ही  अधिकारी, राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 56 व्या तुकडीचेच प्रशिक्षणार्थी होते. ही अत्यंत दुर्मिळ आणि एकमेवाद्वितीय घटना आहे. याआधी, 1991 साली, तिन्हीस सेवादलांचे प्रमुख एकाच तुकडीचे प्रशिक्षणार्थी म्हणून एनडीए ( त्यावेळेचा सामाईक सेवा विभाग) इथे होते. प्रबोधिनीला एकत्रित भेट देण्यामागच्या उद्देश  प्रबोधिनीमध्ये एकत्र शिकतांना निर्माण झालेले मैत्रीबंध अधिक दृढ करण्याबरोबर  तिन्ही दलांमधील सौहार्दाची, एकत्रितपणाची भावना अधिक दृढ करणे हा हेतू होता.

अॅडमिरल करमबीर सिंग यांनी नौदलप्रमुख म्हणून 31 मे 2019 रोजी कार्यभार स्वीकारला. राकेश कुमार भदौरिया यांनी 30 सप्टेंबर 2019 रोजी हवाईदल प्रमुख म्हणून तर जनरल एम एम नरवणे  यांनी लष्करप्रमुख म्हणून, 31 डिसेंबर 2019 रोजी पदभार स्वीकारला.

यावेळी तिन्ही सैन्यदलप्रमुखांच्या वतीने आपले मनोगत व्यक्त करतांना नौदलप्रमुखांनी आधुनिक युद्धशास्त्राच्या नवनव्या तंत्रज्ञानाविषयी माहिती दिली. आधुनिक लष्करी नेतृत्वाचे मूलभूत सिद्धांत समजून घ्यावे, असा सल्ला त्यांनी कॅडेट्सना दिला. सर्व प्रमुखांनी सध्या सुरु असलेल्या प्रशिक्षणाचा आणि प्रशिक्षणासाठीच्या पायाभूत सुविधांचा आढावाही घेतला.

आपल्या भेटीदरम्यान तिन्ही सैन्यदलप्रमुखांनी ‘हट ऑफ रिमेमबरन्स’ या शाहिद स्मृतिस्थळी श्रद्धांजली वाहिली. एनडीए संस्थेतून, प्रशिक्षित होऊन गेलेल्या, आणि कर्तव्य बजावताना वीरमरण पत्करलेल्या हुतात्मा अधिकाऱ्यांच्या सन्मानार्थ हे स्मृतिस्थळ तयार करण्यात आले आहे. तसेच या प्रमुखांनी, आपापल्या सेवेतील प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांशी संवादही साधला. त्याशिवाय प्रशिक्षक, व्याख्याते आणि एनडीएतील कर्मचाऱ्यांशीही त्यांनी संवाद साधला.

तिन्ही संरक्षण दलांसाठीच्या या संयुक्त प्रशिक्षण प्रबोधिनीच्या स्थापनेची कल्पना, 1945 साली, त्यावेळेचे लष्करप्रमुख, फील्ड मार्शल सर क्लाउड ऑचिनलेक यांच्या नेतृत्वाखालील समितीतून निर्माण झाली होती. आणि त्यानंतर प्रत्यक्ष अकादमीची स्थापना होऊन, 1949 साली, त्यावेळच्या तात्पुरत्या स्थानी, डेहराडून इथे, अकादमीचे कामकाज सुरु झाले.  सहा ऑक्टोबर 1949 साली खडकवासला इथे या प्रबोधिनीची पायाभरणी झाली आणि 16 जानेवारी 1955 रोजी तिचे उद्घाटन झाले. आपल्या साठ  वर्षांच्या दैदीप्यमान इतिहासात, या प्रबोधिनीतून प्रशिक्षण घेतलेल्या अधिकाऱ्यांपैकी 13 लष्करप्रमुख, 11 नौदलप्रमुख आणि नऊ हवाईदल प्रमुख झाले.

देशाच्या तिन्ही संरक्षण दलांच्या प्रमुखपदाची जबाबदारी सांभाळणारे तीनही अधिकारी, राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या ५६व्या तुकडीचेच प्रशिक्षणार्थी होते. ही अत्यंत दुर्मिळ घटना आहे. याआधी, १९९१ साली, तिन्ही सेनादलांचे प्रमुख एकाच तुकडीचे प्रशिक्षणार्थी म्हणून एनडीएत एकत्र होते.

भेटीचे महत्व :एनडीएमध्ये मुलींना प्रवेश देण्याबाबत सर्वोच्च न्यायलायाने नुकत्याच केलेल्या वक्‍तव्यानंतर तिन्ही सैन्यदल प्रमुखांनी एकत्रितपणे प्रबोधिनीला दिलेल्या भेटील विशेष महत्व दिले जात आहे. यामुळे आगामी काळात एनडीएमध्ये मुलींना प्रवेश देण्याच्या दृष्टीने सकारात्मक विचारासोबतच याबाबतच्या कामांना गती मिळण्याची शक्‍यता असल्याचे मत संरक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांकडून व्यक्त केले जात आहे.

टॅग्स :Puneपुणेnda puneएनडीए पुणेSocialसामाजिकPoliceपोलिसDefenceसंरक्षण विभाग