शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

कौतुकास्पद कामगिरी! महाराष्ट्राच्या एनसीसी ग्रुपने पटकावला मानाचा पंतप्रधान बॅनर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2022 20:21 IST

प्रजासत्ताक दिन संचलन शिबीरात महाराष्ट्राच्या कॅडेट्सनी डंका गाजवला. महाराष्ट्राच्या एनसीसी ग्रुपने तब्बल सात वर्षानंतर उत्कृष्ट कामगीरी करत मानाचा पंतप्रधान बॅनर बहूनाम पटकावला

पुणे : प्रजासत्ताक दिन संचलन शिबीरात महाराष्ट्राच्या कॅडेट्सनी डंका गाजवला. महाराष्ट्राच्या एनसीसी ग्रुपने तब्बल सात वर्षानंतर उत्कृष्ट कामगीरी करत मानाचा पंतप्रधान बॅनर बहुमान पटकावला. या सोबतच मुंबईची पृथ्वी पाटील हीने देशभरातून अव्वल येत मानाचा गॉड ऑफ ऑनरचा मान पटकावत देशभरातून सर्वोत्कृष्ट कॅडेट ठरली. तर पुण्याचा शंतनु मिसाळ हा देशभरातून चौथा आल्याची माहिती ब्रिगेडीअर आर. के. गायकवाड यांनी दिली. 

प्रजासत्ताक दिन संचलन शिबीराच्या निमित्ताने प्रतिष्ठेचा पंतप्रधान बॅनर पटकावण्याचा मान यंदा महाराष्ट्राला मिळाला आहे. दिल्ली येथे शुक्रवारी झालेल्या एका दिमाखदार सोहळ्यात हा बहुमान प्रदान करण्यात आला. यावर्षी राज्यभरातून जवळपास ५७ कॅडेट्सची निवड प्रजासत्ताक दिन संचलन शिबिरासाठी करण्यात आली होती. अतिशय खडतर प्रशिक्षणानंतर राज्यातील १८ कॅडेट्सना राजपथावर संचलन करण्याचा मान मिळाला. यात सिनीअर डीव्हीजनच्या १० मुले आणि ८ मुलींचा समावेश होता. या विद्यार्थ्यांना लेफ्टनंट कर्नल अनिरुद्ध सिन्हा आणि मेजर आरूष शेटे यांनी मार्गर्शन केले. महाराष्ट्राच्या पथकाने  २००२ ते २०१४ दरम्यान सलग सहा वेळा विजेते पद मिळवले होते. यानंतर २०२०, २०२१ मध्ये महाराष्ट्राकडे उपविजेतेपद आले होते आणि आता पुन्हा विजेतेपदाचा मान राज्याच्या एनसीसी कॅडेट्सनी मिळवला आहे.

संपूर्ण महाराष्ट्रातून ५७ छात्रसैनिकांची निवड 

शिबिरासाठी यंदा संपूर्ण महाराष्ट्रातून ५७ छात्रसैनिकांची निवड झाली होती. ५७ मध्ये एकूण १३ छात्रसैनिक मुंबईतील आहेत. १३ मध्ये दहा छात्रसैनिक मुंबई ‘ब’ तर तीन छात्रसैनिक मुंबई ‘अ’ गटातील आहेत. या १३ मध्ये १० छात्रसैनिक मुले तर तीन मुली आहेत. मुंबईत एनसीसीचे दोन गट असून त्यामध्ये २१ युनिट्स आहेत. शिबिरात निवड झालेले १३ छात्रसैनिक या २१ युनिट्समधील आहेत.

''प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात संरक्षण दलांच्या संचलन तुकड्यांसह एनसीसीची तुकडीही सहभागी होत असते. या तुकडीतील छात्रांची निवड विशेष शिबिरातून होत असते. हे शिबीर अत्यंत खडतर असते. त्यामुळेच एकूण शिबीरार्थींपैकी जेमतेम पाच ते सात टक्के छात्रांची निवड प्रत्यक्ष संचलनासाठी होते. या विद्यार्थ्यांना पुण्यातील शिबिरात अत्यंत तज्ज्ञांकडून प्रशिक्षण देण्यात आले होते. या सोबतच विद्यार्थ्यांनीही मनापासून आणि शिस्तीचे दर्शन घडवत हे यश मिळवले आहे असे ब्रिगेडीअर आर. के.गायकवाड (एनसीसी प्रमुख, पुणे विभाग) यांनी सांगितले.''

टॅग्स :IndiaभारतNarendra Modiनरेंद्र मोदीMaharashtraमहाराष्ट्रStudentविद्यार्थीForceफोर्स