शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

आरटीई प्रवेश नाकारणाऱ्या शाळांवर प्रशासक नेमणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2018 11:01 IST

अनेक इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडून आरटीई अंतर्गत प्रवेश देण्यास टाळाटाळ केली जात असल्याने प्रवेश होऊ शकलेले नाहीत.त्यामुळे याची गंभीर दखल शिक्षण संचलनालयाकडून घेण्यात आली आहे.

ठळक मुद्देसंबंधित शाळांचे प्रस्ताव पाठवा : शिक्षण संचालकांचे आदेश आरटीई अंतर्गत पहिल्या फेरीत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी शनिवार (दि.२४ ) पर्यंत मुदत पालकांनी हेल्पलाइनव्दारे केलेल्या तक्रारींची योग्यप्रकारे नोंद ठेवली जात नसल्याचे उजेडात

पुणे : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) येत्या शैक्षणिक वर्षासाठी शाळांच्या २५ टक्के मोफत प्रवेशासाठी आॅनलाइन प्रक्रिया सुरू आहे. त्यानुसार पहिल्या यादीमध्ये विद्यार्थ्यांचे नाव आल्यानंतरही काही शाळा आरटीई अंतर्गत प्रवेश देण्यास नकार देत आहेत. याप्रकाराची गंभीर दखल घेत ज्या शाळांनी आरटीई अंतर्गत प्रवेश देण्यास नकार दिला आहे, त्यांच्यावर प्रशासक नेमण्याचे प्रस्ताव तातडीने पाठविण्यात यावेत असे निर्देश शिक्षण संचालक सुनील चौहान यांनी राज्यातील सर्व शिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहेत.राज्यभरातील ९ हजार शाळांमध्ये आरटीई अंतर्गत १ लाख २६ हजार जागा उपलब्ध आहेत. प्रवेश घेण्यासाठी शनिवार (दि. २४) रोजी शेवटची मुदत असतानाही केवळ १९ हजार ५६५ प्रवेश झाले आहेत. अनेक इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडून आरटीई अंतर्गत प्रवेश देण्यास टाळाटाळ केली जात असल्याने प्रवेश होऊ शकलेले नाहीत.त्यामुळे याची गंभीर दखल शिक्षण संचलनालयाकडून घेण्यात आली आहे.आरटीई अंतर्गत प्रवेश नाकारल्यास त्या शाळांवर प्रशासक नेमण्याचा निर्णय राज्य शासनाने १५आॅक्टोबर २०१२ रोजी घेतला आहे. त्यानुसार महाराष्ट्र शैक्षणिक संस्था (व्यवस्थापन अधिनियम) १९७६ अन्वये प्रशासक नियुक्ती करण्याची कार्यवाही राज्यातील सर्व शिक्षणाधिकारी (प्राथमिक), प्रशासन अधिकारी, शिक्षण निरीक्षक (दक्षिण, उत्तर व पश्चिम मुंबई) यांनी करावी असे आदेश सुनील चौहान यांनी काढले आहेत.    राज्यातील ४१ इंग्रजी माध्यमाच्या शाळा उच्च न्यायालयात गेल्या आहेत. त्या वगळून इतर सर्व शाळांनी आरटीई अंतर्गत विद्यार्थ्यांना २५ टक्के प्रवेश देणे बंधनकारक आहे.आॅनलाइन प्रक्रियेनुसार अनेक विद्यार्थ्यांना शाळांमध्ये परंतु,प्रवेश मिळूनही ते प्रवेश देत नसल्याच्या तक्रारी शिक्षण संचलनालयाकडे करण्यात आल्या आहेत. न्यायालयाने प्रवेश देण्यास मनाई केली असल्याचे या शाळांकडून सांगण्यात येत आहे. मात्र, प्रत्यक्षात केवळ ४१ शाळांच्या प्रवेशाला स्थगिती देण्यात आलेली आहे, उर्वरित सर्व शाळांनी प्रवेशा देणे बंधनकारक आहे.     काही शाळांनी पालकांकडून प्रवेश देण्यासाठी घेतलेली कागदपत्रे अचानक परत करून दिली आहेत. अनेक शाळा न्यायालयाचा निकाल २८ मार्चला लागणार असून त्यामुळे त्यानंतर प्रवेशासाठी या असे सांगत आहेत. शाळांनी प्रवेशासाठी आडमुठी भुमिका स्वीकारल्याने पालकांना मोठया त्रासाला सामोरे जावे लागत आहे. .......................आरटीई प्रवेशाला ४ एप्रिल पर्यंत मुदतवाढआरटीई अंतर्गत पहिल्या फेरीत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी शनिवार (दि.२४ ) पर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र, अनेक इंग्रजी माध्यमांच्या शाळांनी प्रवेश देण्यास टाळाटाळ केल्याच्या पार्श्वभूमीवर पहिल्या फेरीतील पालकांना प्रवेश घेण्यासाठी ४ एप्रिल पर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याचे परिपत्रक शिक्षण विभागाचे उपसंचालक शरद गोसावी यांनी शुक्रवारी काढले.आरटीई प्रवेशाबाबत काही अडचणी असल्यास त्याबाबत पालकांना मार्गदर्शन करण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेमध्ये राज्याची आरटीई प्रवेश हेल्पलाइन सुरू करण्यात आली आहे.संकेतस्थळावर त्या हेल्पलाइनचे क्रमांक देण्यात आले आहेत. मात्र,या क्रमांकावर फोन केले असता पालकांना योग्यप्रकारे माहिती मिळत नाही. तसेच पालकांनी हेल्पलाइनव्दारे केलेल्या तक्रारींची योग्यप्रकारे नोंद ठेवली जात नसल्याचे उजेडात आले आहे. 

टॅग्स :Puneपुणेeducationशैक्षणिकEducation Sectorशिक्षण क्षेत्रStudentविद्यार्थीSchoolशाळा