शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरवेळी एकट्या S-400 ने पाकिस्तानची एवढी विमाने पाडली, हवाईदलप्रमुखांचा मोठा गौप्यस्फोट
2
Salim Pistol: बेकायदेशीर शस्त्रांचा पुरवठा करणाऱ्या 'सलीम पिस्तूल'ला नेपाळमधून अटक!
3
टीम इंडियाचा कॅप्टन गिल इथंही टॉपला! क्रिकेटच्या पंढरीत घातलेली जर्सी लिलावात ठरली लाख मोलाची
4
अमेरिका १, सिंगापुर २, नॉर्वे ३... ही यादी पाहून डोनाल्ड ट्रम्प डोकं पकडतील, कोणती आहे यादी? जाणून घ्या
5
मध्यमवर्गीयांना गरिबीच्या खाईत लोटतात या पाच सवयी, त्वरित न बदलल्यास होईल पश्चाताप
6
विधानसभेला १६० जागा निवडून देण्याची गॅरंटी, 'त्या'२ जणांची ऑफर; शरद पवारांचा सर्वात मोठा दावा 
7
शरणूसोबत 'मस्साजोग' करायचं होतं; सोबत ट्रिमर, साडी, ब्लाऊज अन् कंडोम होतं, सत्य समजताच पोलीस चक्रावले
8
काश्मीर मुद्द्यावर पाकिस्तानचं पुन्हा रडगाणं; आता म्हणतायत "अमेरिका किंवा इतर कोणत्याही देशाची मध्यस्थी चालेल पण..."  
9
रेल्वेची राऊंड ट्रिप योजना...! तिकिटांवर २० टक्के डिस्काऊंट देणार, अटी एवढ्या की...; एवढे करून मिळाले जरी...
10
ICC नं टीम इंडियाला दिली होती वॉर्निंग; तरीही कोच गंभीर राहिला 'खंबीर', अन्... पडद्यामागची गोष्ट
11
अतूट नातं! १७ वर्षांपासून 'या' अभिनेत्याला राखी बांधतेय ऐश्वर्या राय; प्रेमाने मारते 'अशी' हाक
12
भाजपाच्या मित्रपक्षांमध्ये वाद, NDA सरकारमध्ये वाढली डोकेदुखी; बंद दाराआड बैठक घेणार
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये या अभिनेत्याची एन्ट्री, साकारणार रावणाच्या जवळच्या व्यक्तीची भूमिका
14
हे जग सोडून गेलेल्या बहिणीच्या हाताने रक्षाबंधन! वलसाडच्या भावासाठी 'ती' जिवंत हात घेऊन आली...
15
पत्नी आणि दोन मुलींची हत्या करून पती फरार; तिहेरी हत्याकांडांने दिल्ली हादरली
16
'या' देशातील लोक आता आपला पत्ताच बदलणार; संपूर्ण देश ऑस्ट्रेलियामध्ये सामील होणार! कारण काय?
17
ICICI Bank Minimum Balance: आता ₹१०००० नाही, बचत खात्यात ₹५०००० चा मिनिमम बॅलन्स ठेवावा लागणार, 'या' दिवसापासून नियम लागू होणार
18
मर्मबंध! आईच्या दुधाचा स्वाद, ब्रेस्ट मिल्क फ्लेव्हर्ड आईस्क्रीमची तुफान चर्चा, पण हे आहे तरी काय?
19
हृदयद्रावक! रक्षाबंधनासाठी येणाऱ्या भावासोबत आक्रित घडलं, वाट पाहत होत्या बहिणी पण...
20
लफडं! पतीचे हात तोडले अन् १० वर्ष लहान भाच्यासोबत पळाली मामी; नात्याला काळीमा फासणारी कहाणी

जेजुरीत कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला; प्रशासन लागले कामाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2020 15:46 IST

तालुक्यात एकच खळबळ, संक्रमणाची साखळी रोखण्यासाठी योग्य त्या उपाय योजना राबविल्या जाणार

ठळक मुद्देसंपूर्ण प्रशासन आता कामाला लागले असून जेजुरी शहराची नाकेबंदी

जेजुरी: तीर्थक्षेत्र जेजुरीत कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीमधील एका डायलिसिस सेंटरमध्ये टेक्निशियन म्हणून काम करणाऱ्या २६ वर्षीय कर्मचाऱ्याचा कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. रुग्णाला आज उपचारासाठी पुणे येथे हलवण्यात आले आहे. सेंटरमधील इतर  कर्मचाऱ्यांसोबतच संपर्कातील सर्वांना क्वारंटाईन करण्यात आले असून त्या सर्वांची तपासणी केली जाणार आहे. 

दरम्यान, भक्त निवास इमारतीवर औषध फवारणी करून निर्जंतुकीकरण करण्यात आली आहे.  मार्तंड देव संस्थान ने दोन हजारावर बेघर, गरजू साठी गेले महिनाभर येथूनच अन्नदान सेवा सुरू केली होती. जेजुरी व परिसरातील अनेक कुटुंबाना किराणा किट वाटप केले आहे.  साधारणपणे दीड कोटी रुपये खर्चून देव संस्थान ने सर्वसामान्यांना मदत केली आहे. दररोज शेकडो लोकांचा संपर्क आला असल्याने शहरात प्रचंड भीतीचे बातावरण निर्माण झाले आहे.  

तीर्थक्षेत्र जेजुरीत कोरोना संक्रमित रुग्ण आढळल्याने पुरंदरचा प्रशासन विभाग खडबडून जागा झाला असून या रोगाचा प्रसार रोखणे व संक्रमण होऊ नये म्हणून आता वेगवेगळ्या उपाययोजना सुरू करण्यात येत आहेत. पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या आदेशानुसार आपत्ती व्यवस्थापन विभागीय अधिकारी म्हणून पुरंदर चे प्रांताधिकारी प्रमोद गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक नेमण्यात आले आहे. या पथकात जेजुरीच्या मुख्याधिकारी, जेजुरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक, जेजुरी ग्रामीण रुग्णालय अधीक्षक, तालुका गट विकास अधिकारी आणि तालुका आरोग्य अधिकारी यांचा समावेश आहे. या पथकाच्या माध्यमातून जेजुरी परिसरातील संक्रमित रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांची यादी, त्यांचा अजून कोणाशी संपर्क आला आहे का याची माहिती गोळा केली जाणार आहे. संक्रमणाची साखळी रोखण्यासाठी योग्य त्या उपाय योजना राबविल्या जाणार आहेत. यात जेजुरी व परिसराचे कॅटेन्मेंट झोन व बफर झोन तयार करण्यात आले आहेत. सर्वप्रथम जेजुरीतील सर्व दैनंदिन व्यवहार पुढील तीन दिवसासाठी बंद ठेवण्यात आले आहेत. केवळ अत्यावश्यक सेवाच सुरू राहणार आहेत. शहराची संपूर्ण नाकाबंदी करण्यात आली आहे. वाहनांची तपासणी करणे, वाहन बंदी करणे,  संचारबंदी कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जे जे उपाय योजना कराव्या लागतील त्या उपाय योजना राबवण्याचे अधिकार या समितीला देण्यात आलेले आहेत.  जेजुरी नगरपालिका हद्दीतील संपूर्ण जेजुरी शहर, खोमणे आळी, जेजुरी ग्रामीण, रेल्वे स्टेशन, कडेपठार परिसर ज्ञानोबा नगर, खोमणे मळा आदी परिसर प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. तर जेजुरी शहरालगतच्या गावे यात जगताप वस्ती, कोथळे, धालेवाडी, रानमळा, जेजुरी औद्योगिक वसाहत, कोळविहिरे, मावडी, नाझरे जलाशय परिसर, नाझरे क. प, नाझरे सुपे, खैरे वाडी  निळुंज, वाळुंज, हा परिसर बफर झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. या परिसरातील रहिवाशांना याबाबत मार्गदर्शन करावे, त्याच बरोबर आशा, आरोग्य केंद्र कर्मचारी यांच्या मार्फत आरोग्य तपासणी करावी, बाधित अथवा कोरोना सदृष्य रुग्णांची माहिती नियंत्रण कक्षाला कळवणे, रोगाविषयी प्रचार, घ्यावयाची काळजी बाबत माहिती देणे आदी उपाययोजना राबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.संपूर्ण प्रशासन आता कामाला लागले असून जेजुरी शहराची नाकेबंदी करण्यात आली आहे. लोकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात  आले असून कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांची यादी बनवली जात आहे.

टॅग्स :JejuriजेजुरीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस