शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

गुणवत्ता नाही म्हणून समायोजन; शाळा बंदचे गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून अजब कारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 12:23 IST

तुमच्या मुलांमध्ये गुणवत्ता नाही. म्हणून तुमची शाळा बंद करून त्यांना हुशार मुले असलेली ३.५० किमी अंतरावरील माळेवाडी येथील शाळेत समायोजन करत आहोत. असे लेखी पत्रच शेलारपट्टा येथील पालकांना गटशिक्षण अधिकारी राजकुमार बामणे यांनी दिले.

ठळक मुद्देया मुलांना ३.५० किमी दररोज चालत जाणे नाही शक्य, रस्तादेखील खराबआम्ही जिल्हा परिषदेच्या आश्वासनांचे पालन केले : राजकुमार बामणे, गट शिक्षण अधिकारी 

पुणे : तुमच्या मुलांमध्ये गुणवत्ता नाही. म्हणून तुमची शाळा बंद करून त्यांना हुशार मुले असलेली ३.५० किमी अंतरावरील माळेवाडी येथील शाळेत समायोजन करत आहोत. असे लेखी पत्रच शेलारपट्टा येथील पालकांना गटशिक्षण अधिकारी राजकुमार बामणे यांनी दिले. या वेळी शिक्षिका व केंद्रप्रमुख कृष्णा हेळकर हेदेखील उपस्थित होते. शाळा बंद करण्याचे हे अजब कारण पाहून येथील पालकांत व नागरिकांमध्ये  मोठे संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.आमच्या मुलांमध्ये गुणवत्ता नाही तर मग इतकी वर्ष आपले शिक्षक या शाळेवर दररोज येऊन नेमके काय करत होते, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. इतकी वर्ष येथे शिकवणाऱ्या शिक्षिकेला दिला गेलेला पगारदेखील वायाच गेला. तोदेखील शासनाने वसूल करून शासन जमा करावा. अशी संतप्त प्रतिक्रिया पालक शंकर नगरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. त्याचबरोबर आमची मुलं मंदच आहेत आणि मला व माझा पत्नीला दररोज मोलमजुरी करूनच पोट भरावे लागते. त्यामुळे मी माझ्या मुलीला रोज माळेवाडीला शाळेत सोडायला किंवा आणायला जाऊ शकत नाही. शाळा माळेवाडी येथे समायोजित केली तशी आमच्या मुलांची नेण्याची व आण्याची सोय करावी. आणि काय आमची मुलं माळेवाडी येथे गेल्यावर हुशार होतील, याची लेखी हमीदेखील गटशिक्षण अधिकाऱ्यांनी द्यावी. तरच आमची मुलं माळेवाडी येथे पाठवायला काही हरकत नाही. असे मत पालक शंकर नगरे यांनी व्यक्त केले.  तरी या वेळी सोमनाथ शिंदे, स्वप्निल काळे, रामदास इंजे, शिवाजी भोई, सुनील नगरे, मल्लापा नाटेकर, शंकर नगरे, विकी जावळे, महादेव इंजे, चंद्रकांत जावळे तरी लवकरात लवकर ही शाळा सुरू करून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान करणाºया शिक्षकेची चौकशी  करावी, अशी मागणी करत आहेत

विद्यार्थ्यांची साडेतीन किमीची पायपीटशेलारपट्टा येथील शाळा माळेवाडी येथील शाळेत कागदोपत्री समायोजन केले, तरी या मुलांना ३.५० किमी दररोज चालत जाणे शक्य नाही. शिवाय, येथील जायचा रस्तादेखील खूप खराब आहे.शिवाय पावसाळ्यात तर अक्षरश: जीव मुठीत घेऊन नागरिकांना प्रवास करावा लागतो. मग विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा तर विचारच करायला नको.

विद्यार्थ्यांची गुणवता कमी असण्यापाठीमागे शिक्षकांचा नाकर्तेपणा आहे. उलट विद्यार्थ्यांची गुणवत्ता कमी झाल्याबद्दल शाळा बंद न करता त्या शिक्षकांवर कारवाई करावी.

- बाळासाहेब काळे, पंचायत समिती सदस्य

आम्ही जिल्हा परिषदेच्या आश्वासनांचे पालन केले आहे.    - राजकुमार बामणे, गट शिक्षण अधिकारी  

टॅग्स :educationशैक्षणिकPuneपुणे