विमानतळावर मद्य विकल्या जाते, संत्रा का नाही ?  गडकरींचा संतप्त सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2017 08:30 PM2017-12-16T20:30:32+5:302017-12-16T20:33:48+5:30

एकीकडे देशातील विमानतळांवर विदेशी मद्य व वस्तूंची विक्री होते. मात्र देशातील शेतकऱ्यांच्या कष्टातून उत्पादित संत्रा व इतर फळे कुठेही दिसून येत नाही. विमातळावर मद्य विकल्या जाते, मग संत्रा का नाही, असा संतप्त सवाल केंद्रीय भूपृष्ठ वााहतूक, जहाजबांधणी व जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी केला.

At the airport, alcohol is sold, why not orange? Gadkari's angry question | विमानतळावर मद्य विकल्या जाते, संत्रा का नाही ?  गडकरींचा संतप्त सवाल

विमानतळावर मद्य विकल्या जाते, संत्रा का नाही ?  गडकरींचा संतप्त सवाल

Next
ठळक मुद्दे ‘नर्सरी’ना संशोधनात सहभागी करून घ्या

ऑनलाईन लोकमत 
नागपूर : एकीकडे देशातील विमानतळांवर विदेशी मद्य व वस्तूंची विक्री होते. मात्र देशातील शेतकऱ्यांच्या कष्टातून उत्पादित संत्रा व इतर फळे कुठेही दिसून येत नाही. विमातळावर मद्य विकल्या जाते, मग संत्रा का नाही, असा संतप्त सवाल केंद्रीय भूपृष्ठ वााहतूक, जहाजबांधणी व जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी केला.
विमानतळावर ‘महाआॅरेंज’च्या माध्यमातून संत्राविक्रीची परवानगी द्यावी, अशी आठ महिन्यांअगोदर विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना विनंती केली होती. यासंदर्भात केंद्रीय कृषी सचिवांनाही सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, काहीच पावले उचलण्यात आली नाही. अखेर कठोर भूमिका घेतल्यानंतर ही परवानगी मिळाली, असे सांगत त्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या कार्यशैलीवर नाराजी व्यक्त केली.
विमानतळ, रेल्वेस्थानक येथे संत्रा विक्रीला आला तर त्याला जास्त बाजारपेठ मिळेल व त्याची चव जगापर्यंत जाईल. यासंदर्भात परवानगी मिळाली आहे. आता या मालाचे योग्य व दर्जेदार ‘पॅकेजिंग’ कसे होईल, यासंदर्भात पुढाकार घेण्यासंदर्भात कृषी मंत्रालयातील सचिवांना निर्देश द्या, अशी सूचना त्यांनी केंद्रीय कृषी राज्यमंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांना केली. मदर डेअरीसोबत महाआॅरेंजचा करार करण्यात आला असून, आता नागपूरचा संत्रा दिल्लीत मदर डेअरीच्या सर्व स्टॉलवर विकल्या जाईल, असेही त्यांनी सांगितले.
गडकरी म्हणाले, पतंजलीसारखे उद्योग समूह विदर्भात येत असल्याने संत्र्याची मागणी वाढणार आहे. दररोज त्यांना ८०० टन संत्रा उपलब्ध करून देणे हे आव्हानच राहणार आहे. यासाठी संत्र्याचे उत्पादन वाढवावे लागेल. यासाठी संत्र्याच्या चाांगल्या कलमा लागतील. वरुड, मोर्शी या भागात चांगल्या ‘नर्सरी’ आहेत. त्यांचे अपग्रेडेशन करून त्यांना संशोधनात सहभागी करून घ्या. त्यांना मार्गदर्शन करून नवीन कलमांवर प्रयोग करा, अशी सूचना ‘सीसीआरआय’ला केली होती. अद्याप त्याची अंमलबजावणी झाली नसल्याचे सांगत त्यांनी नाराजी व्यक्त केली.
ठिबक सिंचनाबद्दल केंद्र सरकारकडून मिळणारे अनुदान खूप उशिरा मिळते. प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या हाती ते अनुदान पोहोचेपर्यंत भ्रष्टाचारामुळे ते शिल्लकच राहत नाही. अनुदान उशिरा आल्यामुळे शेतकऱ्यांना महाग साहित्य खरेदी करावे लागते. त्यामुळे या योजनेतील ‘लक्ष्मीदर्शन’ बंद झाले पाहिजे, असे म्हणत त्यांनी कृषी विभागातील गैरप्रकार केंद्रीय कृषी राज्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले.

जलमार्गाने संत्रा बांगलादेश, म्यानमारपर्यंत
 येथील संत्रा ड्रायपोर्टवरून रेल्वेने साहीबगंजला पोहोचविला जाईल. तेथून जलमार्गाने जहाजाद्वारे कोलकाता, बांगलादेश, म्यानमार व दक्षिण-पूर्व आशियापर्यंत पोहोचविला जाईल. यामुळे वाहतुकीवर येणारा खर्च कमी होईल, असे गडकरी यांनी सांगितले. राज्य सरकारने फळ निर्यातीचे धोरण आखले आहे. प्री- कुलिंग प्लांट व कोल्ड स्टोरेज उभारण्यासाठी राज्य सरकार मदत करीत आहे. या कामासाठी गुंतवणूकदारांनीही पुढाकार घ्यावा, असे आवाहनही गडकरी यांनी केले.

Web Title: At the airport, alcohol is sold, why not orange? Gadkari's angry question

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.