शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
3
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
4
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
5
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
6
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
7
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
8
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
9
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
10
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
11
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
12
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
13
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
14
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
15
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
16
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
17
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
18
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
19
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
20
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?

वृत्तपत्र विक्रेता ते संस्थापक : ‘पुण्यनगरी’चे अध्वर्यू मुरलीधर शिंगोटे यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Published: August 07, 2020 5:31 AM

वृत्तपत्र विक्रेता ते संस्थापक असा प्रवास

पुणे : दैनिक पुण्यनगरीचे संस्थापक-संपादक मुरलीधर अनंता ऊर्फ बाबा शिंगोटे (वय ८२) यांचे गुरुवारी दुपारी एक वाजता त्यांचे गायमुखवाडी (ता़ जुन्नर) येथे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुले अरविंद, प्रवीण व संदीप, तीन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. वृत्तपत्र विक्रेता ते दैनिकाचे संस्थापक असा प्रवास त्यांनी केला. त्यांच्या पार्थिवावर सायंकाळी उंब्रज येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे पुत्र संदीप यांनी पार्थिवाला मुखाग्नी दिला.

बाबांचा जन्म जुन्नर तालुक्यातील उंब्रज येथे ७ मार्च १९३८ ला झाला. चौथी शिक्षण झालेल्या बाबांनी शिक्षण अर्धवट सोडल्यानंतर नोकरी-व्यवसायासाठी मुंबई गाठली. सुरुवातीला फळविक्री, त्यानंतर बुवाशेठ दांगट यांच्याकडे वृत्तपत्र टाकण्याचे काम सुरू केले. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीसाठी मुुंबईतल्या फाउंटन परिसरात आंदोलन झाले होते, त्याचे बाबा साक्षीदार होते. वृत्तपत्र विकताना सर्वसामान्यांना समजेल आणि वाचता येईल अशा भाषेतले वृत्तपत्र काढण्याचे स्वप्न त्यांनी उराशी बाळगले होते. १९९४ मध्ये मुंबई चौफेर नावाचे सायंदैनिक सुरू केले. यानंतर दैनिक आपला वार्ताहर, दैनिक यशोभूमी, दैनिक कर्नाटक मल्ला, तामिळ टाइम्स, हिंदमाता ही दैनिके सुरू केली. दैनिक पुण्यनगरीची मुहूर्तमेढ १९९९ मध्ये रोवली. मराठी भाषिक वृत्तपत्रांसोबत इतर भाषिक दैनिक प्रकाशित करणारे मुरलीधर शिंगोटे हे एकमेव होते.बाबा नावाचे ध्यासपर्व निमाले!मुरलीधर उर्फ बाबा शिंगोटे हे एका ध्यासपर्वाचे नाव आहे. ते ध्यासपर्व आज निमाले. शांत झाले. आयुष्य क्षणभंगुर आहे, असे आपण म्हणतो. पण ते आयुष्य जगण्याची प्रेरणाही असू शकते, ते बाबांच्या जगण्यावरून सिद्ध होते. लौकिक शिक्षण नसूनही त्यांची दृष्टी विलक्षण होती, अचाट होती. त्यांच्याकडे विचार होते. त्यांनी वाचकांची नाडी ओळखली होती. त्यांनी शब्दांचे मोल जाणले होते. त्यांचे जगणे म्हणजे, ‘शब्दची अमुच्या जीविचे जीवन, शब्द वाटू धन जनलोका...’ या तुकोबारायांच्या शब्दाचे सार होते. बातमीच्या रूपात कागदावर उमटलेल्या त्यांच्या अक्षरांनी महाराष्ट्रात एक विश्वास निर्माण केला आणि बाबा नावाच्या वर्तमानपत्रातील युगाची सुरुवात झाली. मराठी, हिंदीसह देशातील काही प्रादेशिक भाषांमधील दैनिकांची त्यांनी सुरुवात केली. दैनिक प्रसिद्ध करणे आणि ते काही काळ चालवणे अशक्य नाही. पण, ते वाचकाभिमुख करत वाढविणे हे अपार कष्टाचे काम आहे. त्यांनी वर्तमानपत्रांचा पसारा राज्यभर पसरविला. वर्तमानपत्र विकणारा माणूस राज्यव्यापी दैनिकांचा संस्थापाक असू शकतो, हा वर्तमानपत्राच्या जगातील एक चमत्कार आहे. या अथार्ने ते तपस्वी ठरतात. माझा आणि त्यांचा अनेक दशकांचा संवाद आहे. ते म्हणायचे, मी जमिनीवरील छोटासा माणूस आहे. तोच माझा वर्तमान आहे. त्यांच्या मनात कधीच कुणाबद्दल द्वेषभावना नव्हती. मत्सर नव्हता, ते सच्चे आणि निगर्वी होते.सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी पणतीच्या प्रकाशासारखी माझी वाटचाल आहे, इतका विनम्रभाव त्यांच्या जगण्यात होता. दोन वर्र्षांपूर्वी पुण्यात त्यांना माझ्या हस्ते महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचा ' स्वातंत्र्यसैनिक स्वर्गीय जवाहरलाल दर्डा जीवनगौरव पुरस्कार दिलागेला. बाबांचे पुरस्कारप्राप्तिनंतरचे भाषण त्यांच्या आयुष्यचं प्रतिबिंब आहे. ते म्हणाले होते, जवाहरलाल दर्डा जीवनगौरव पुरस्काराने माझा हुरूप वाढला. श्रद्धेय बाबूजींचा आशीर्वाद या पुरस्कारामुळे मिळाला आहे.नवी उमेद जागवणाऱ्या बाबा शिंगोटे यांना माझी आणि माझ्या ‘लोकमत’ परिवाराची आदरांजली.- विजय दर्डा,चेअरमन, लोकमत एडिटोरिअल बोर्डवृत्तपत्रसृष्टीतील ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व

अत्यंत मेहनती, चौकस आणि वाचकांना काय हवे याची नाडी गवसलेल्या मुरलीधर (बाबा) शिंगोटे यांच्या निधनाने वृत्तपत्र सृष्टीतील एक ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व हरवले आहे. माझी आणि बाबांची पहिली भेट मे १९९८ मध्ये मुंबई लोकमत सुरू होताना झाली. मुंबई लोकमतची एजन्सी शिंगोटे परिवाराला दिली, त्यावेळी शिंगोटेंकडे चौफेर आणि यशोभूमी ही वृत्तपत्रे होती. दररोज पहाटे ३ वाजता बाबांची आणि माझी भेट होत होती. अंकाला उशीर झाला की ते म्हणायचे, एखादी बातमी सुटली, तरी चालेल; पण वृत्तपत्र वेळेवरच पाहिजे. १९९९ मध्ये बाबांनी पुण्यनगरी हे वृत्तपत्र काढले आणि पुण्यनगरीने बघता बघता महाराष्ट्रातीलएक अग्रेसर दैनिक म्हणून नावलौकिक मिळवला. छोट्या-छोट्या बातम्यांसाठी बाबा आग्रही असायचे. कदाचित पुण्यनगरीने मिळविलेल्या यशाचे हेच गमक असावे. बाबा शिंगोटे यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी भरून न निघणारी आहे. पुण्यनगरी परिवाराला हे दु:ख सहन करण्याची ताकद मिळो, हीच ईश्वराजवळ प्रार्थना.

- राजेंद्र दर्डा, एडिटर-इन-चिफ; लोकमत वृत्तपत्र समूह

टॅग्स :PuneपुणेDeathमृत्यू