शहरं
Join us  
Trending Stories
1
आषाढी एकादशी सोहळा; मुख्यमंत्र्यांची शासकीय महापूजा; नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
2
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
3
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
4
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
5
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
6
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
7
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
8
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
9
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
10
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
11
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
12
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
13
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
14
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
15
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
16
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
17
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
18
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
19
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
20
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या अंत्यसंस्कारासाठी महापालिकेकडे पुरेशी साधनसामुग्री 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2021 21:52 IST

अंत्यसंस्कार करणाऱ्या सेवकांना महापालिकेने आत्तापर्यंत ७ हजार ४१७ पीपीई किट, १२ हजार ५१२ हॅण्ड ग्लोज, १ हजार ८९५ एन-९५ मास्क, सर्जिकल मास्क व सॅनिटायझर पुरविले आहेत.

पुणे : कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींवर अंत्यसंस्कार करण्यासाठी पुणे महापालिकेला शहरातील स्वयंसेवी संस्थांची मोठी मदत झाली. सहा- सात संस्थांचे प्रत्येकी २० ते २५ प्रतिनिधी याकरिता गेली वर्षभर शहरातील विविध स्मशानभूमीत, दफनभूमीत कार्यरत आहेत. 

सदर सेवकांना महापालिकेने आत्तापर्यंत ७ हजार ४१७ पीपीई किट, १२ हजार ५१२ हॅण्ड ग्लोज, १ हजार ८९५ एन-९५ मास्क, सर्जिकल मास्क व सॅनिटायझर पुरविले आहेत. तसेच या संस्थांनाही अनेकांना शहरात स्वत:हून या साहित्यांचा पुरवठा केला आहे. यामुळे शहरात कोरोनाबाधितांवर अंत्यसंस्कार करणाऱ्या व्यक्तींनाही आजपर्यंत कोरोना संरक्षण किटचा पुरवठा कमी झाल्याची तक्रार आलेली नाही. 

पुणे महापालिका आपल्या तथा शासनाच्या शववाहिकेतून कोरोनाबाधितांचे मृतदेह स्मशानभूमी अथवा दफनभूमीपर्यंत पोहचविताना, सदर शववाहिकेतील चालक व सहकाऱ्याला प्रत्येक वेळी नवे पीपीई किट वापरण्याचे बंधनकारक करण्यात आले आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागातून हे पीपीई किट शववाहिका चालकांनी दररोज घ्यावेत अशा सूचनाच आरोग्य विभागाकडून संबंधितांना देण्यात आल्या आहेत. यामुळे दिवसाला साधारणत: १५० पीपीई किट शहरात अत्यंविधीसाठी वापरले जात असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे. --------------शहरातील एकूण कोरोनाबाधित संख्या - २ लाख ६९ हजार ३४३ बरे झालेले रूग्ण - २ लाख ३० हजार १८३उपचार सुरू -३० हजार ८५८ कोरोनाबळी -५ हजार ३०२------------------कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीचा मृतदेह हाताळताना संबंधित व्यक्तींना पीपीई किटचा पुरवठा वेळेत होईल याची खबरदारी आरोग्य विभागाने घेतली आहे़ या कामात स्वयंसेवी संस्थांचाही मोठा पुढाकार राहिला आहे. डॉ.कल्पना बळीवंत, सहाय्यक आरोग्य अधिकारी पुणे मनपा.--------------

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाcorona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यू