राज्यात अतिरिक्त दुधाचा प्रश्न गंभीर; शेतकरी, डेअरी अडचणीत, दररोज ८० लाख लीटर अतिरिक्त दूधसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2017 01:11 AM2017-11-19T01:11:40+5:302017-11-19T01:11:57+5:30

राज्यात दुधाचा खरेदी दर महाग असताना आंतरराष्ट्रीय बाजारात दूध पावडर आणि बटरचे दर मोठ्या प्रमाणात कोसळले आहेत. यामुळे पावडर व बटर निर्मिती करणाºया अनेक कंपन्यांनी दूधाची खरेदी थांबविले आहेत़

Additional milk question in state serious; Over 80 lakh liters of additional milk stocks per day, farmers, dairy complexes | राज्यात अतिरिक्त दुधाचा प्रश्न गंभीर; शेतकरी, डेअरी अडचणीत, दररोज ८० लाख लीटर अतिरिक्त दूधसाठा

राज्यात अतिरिक्त दुधाचा प्रश्न गंभीर; शेतकरी, डेअरी अडचणीत, दररोज ८० लाख लीटर अतिरिक्त दूधसाठा

googlenewsNext

- सुषमा नेहरकर-शिंदे 

पुणे : राज्यात दुधाचा खरेदी दर महाग असताना आंतरराष्ट्रीय बाजारात दूध पावडर आणि बटरचे दर मोठ्या प्रमाणात कोसळले आहेत. यामुळे पावडर व बटर निर्मिती करणाºया अनेक कंपन्यांनी दूधाची खरेदी थांबविले आहेत. परिणामी राज्यात दररोज तब्बल ८० लाख लिटर अतिरिक्त दूध साठा शिल्लक राहत आहे. याने दूध उत्पादक शेतकरी व सहकारी व खाजगी दूध डेअºया अडचणीत सापडल्या आहेत.
सध्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारात दूध पावडरचे दर २६० वरून १२० पर्यंत व बटरचे दर ३४० वरुन थेट २७० रुपयांपर्यंत खाली आले आहेत. यामुळे दूध पावडर व बटरसाठी विक्री होणाºया दुधाचे दर २९ रुपयांवरून २१ रुपयांपर्यंत खाली आले आहेत. परंतु शासनाने शेतकºयांना एक लिटरसाठी किमान २७ रुपये दर निश्चित केला आहे.
यामुळे सहकारी व खासगी दूध डेअºया अडचणीत आल्या आहेत. खरेदी दर महाग असताना पावडरचे दर उतरल्याने अनेक कंपन्यांनी उत्पादन बंद केले आहे.

राज्यात दररोज सरासरी १ कोटी २० लाख लिटर दूध उत्पादन होते. यापैकी केवळ ४० टक्के दूध पिशवी व सुट्या स्वरुपात विक्री केली जाते. तर तब्बल ६० टक्के दूध पावडर व बटर या बायप्रोडक्टसाठी विक्री केली जाते. परंतु मागणी नसल्याने हजारो टन दूध पावडर शिल्लक पडून आहे.

अनुदान, बफर स्टॉकची मागणी
राज्यात साधारण आॅक्टोबर ते मार्च हा जनावरांचा पुष्टकाळ किंवा दूध उत्पादनासाठी सुकाळ मानला जातो. परंतु सध्या अनेक जिल्ह्यांमध्ये प्रामुख्याने आमूल व अन्य काही खाजगी दूध डेअºयांनी अतिरिक्त दूध खरेदी थांबवली आहे. यामुळे दूध उत्पादक शेतकरीदेखील अडचणी सापडला आहे. त्यामुळे कर्नाटक शासनाप्रमाणे शेतकºयांना प्रति लीटर ५ रुपये सबसिडी द्यावी आणि उत्पादन होणारे जादा दूध शासनाने खरेदी करून बफर स्टॉक करावा, अशी मागणी राज्यातील दूध उत्पादक कृती समितीने राज्य शासनाकडे केली आहे.
- विष्णू हिगे, अध्यक्ष,
पुणे जिल्हा दूध उत्पादक सहकारी संघ

Web Title: Additional milk question in state serious; Over 80 lakh liters of additional milk stocks per day, farmers, dairy complexes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे