Pimpri Chinchwad: सोशल मीडियावर जाहिरात पाहिली, २३ लाखांनी गंडले; चिंचवडमधील प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2024 12:38 PM2024-02-05T12:38:55+5:302024-02-05T12:40:02+5:30

चिंचवड येथील संभाजीनगरमध्ये ४ डिसेंबर २०२३ ते २९ जानेवारी २०२४ या कालावधीत ही घटना घडली...

Ad seen on social media, 23 lakhs clicked crime in Chinchwad | Pimpri Chinchwad: सोशल मीडियावर जाहिरात पाहिली, २३ लाखांनी गंडले; चिंचवडमधील प्रकार

Pimpri Chinchwad: सोशल मीडियावर जाहिरात पाहिली, २३ लाखांनी गंडले; चिंचवडमधील प्रकार

पिंपरी : शेअर्स मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला फायदा होईल, असे सांगितले. त्यानंतर शेअर्स खरेदी करण्याच्या बहाण्याने व्यावसायिकाची २३ लाख ४० हजारांची फसवणूक केली. चिंचवड येथील संभाजीनगरमध्ये ४ डिसेंबर २०२३ ते २९ जानेवारी २०२४ या कालावधीत ही घटना घडली.

संतोष एकनाथ गायकवाड (४७, रा. संभाजीनगर, चिंचवड) यांनी याप्रकरणी निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार विविध मोबाईल क्रमांक धारक तसेच बँक खातेधारक यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयितांनी एका कंपनीच्या माध्यमातून शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला फायदा होईल, अशा प्रकारची जाहिरात सोशल मीडियावर दिली होती. ती जाहिरात फिर्यादी गायकवाड यांनी पाहिली. त्यानंतर संशयितांसोबत संपर्क झाल्यानंतर त्यांनी गायकवाड यांना शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवण्यास भाग पाडले. पैसे कमावण्याचे आमिष दाखवून वेळोवेळी शेअर्स खरेदी करण्यासाठी गायकवाड यांच्याकडून संशयितांनी २४ लाख रुपये घेतले. दरम्यान त्यांनी गायकवाड यांना ६० हजार रुपये परत दिले. उर्वरित २३ लाख ४० हजार रुपये परत न देता त्यांची फसवणूक केली.

Web Title: Ad seen on social media, 23 lakhs clicked crime in Chinchwad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.