शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

इमारतीच्या टेरेसवर खून झालेल्या तरुणीच्या खुनाचा लावला छडा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2019 20:44 IST

प्रेमसंबंधातून झालेल्या भांडणावरून मनात राग धरून तरुणीवर केले होते वार

ठळक मुद्देआरोपीस घेतले गुलबर्गा येथून ताब्यात ; सिंहगड रस्ता पोलिसांची कामगिरी

नऱ्हे : सोलापूरहून आलेल्या तरुणीला इमारतीच्या टेरेसवर नेऊन धारदार शस्त्रांनी वार केल्याची धक्कादायक घटना नऱ्हे येथील मानाजीनगर भागात २२ सप्टेंबरला दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडली होती. दरम्यान घटनेतील तरुणी प्रियांका वसंत आरेनवरु (वय २१, मु. पो. मैंदर्गी ता. अक्कलकोट जि. सोलापूर) हिला जखमी अवस्थेत उपचारासाठी ससूनला दाखल केले होते. मात्र २३ सप्टेंबरला उपचारादरम्यान तिचे निधन झाले होते. याबाबत पोलिसांनी फरार असणारा आरोपी बसवराज सिद्धप्पा हिळळी (वय २७, मूळ गाव : मु. तळेवाड पो. बोरोटी ता. अक्कलकोट जि. सोलापूर) या तरुणास आज सिंहगड रस्ता पोलिसांनी गुलबर्गा येथून ताब्यात घेतले आहे.

सिंहगड रस्ता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत तरुणी व आरोपी हे सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील असल्याने दोघांत फेसबुकवरून मैत्री झाली, त्यानंतर मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले, प्रियांका ही घटनेच्या दोनच दिवसांपूर्वी पुण्यातील बहिणीकडे राहावयास आली होती. तर बसवराज हा पुण्यामध्ये एका खासगी कंपनीत नोकरी करीत होता, व तो नऱ्हे येथील मानाजीनगर परिसरात मिंत्रासमवेत भाड्याने फ्लॅट घेऊन राहत होता. घटनेच्या दिवशी सकाळी प्रियांकाला सोबत घेऊन तो राहत असलेल्या नऱ्हे येथील फ्लॅटच्या टेरेसवर गप्पा मारण्यासाठी घेऊन गेल्यानंतर प्रेमसंबंधातून झालेल्या भांडणावरून मनात राग धरून बसवराजने सोबत आणलेल्या चाकूने तिच्या छातीवर, पाठीवर सपासप वार केले व त्यानंतर तो पळून गेला. जखमी प्रियांकाला उपचारासाठी ससूनला दाखल करण्यात आले होते मात्र उपचारदरम्यान तिचा मृत्यू झाला.सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी सर्व शक्यता गृहीत धरून आरोपीचा शोध घेण्याकरिता तपास पथकातील अधिकारी व कर्मचारी यांच्या वेगवेगळ्या टीम तयार करून आरोपीच्या शोधासाठी वेगवेगळ्या ठिकाणी पाठवण्यात आल्या होत्या. मात्र आरोपी उच्चशिक्षित असल्याने वेळोवेळी लोकेशन बदलत होता. आरोपीबाबत मिळालेली माहिती व तांत्रिक तपास करून आरोपीला आज गुलबर्गा येथून ताब्यात घेण्यात आले. याबाबत पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक चेतन थोरबोले करीत आहेत.सदरची कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, पोलीस उप-आयुक्त  पौर्णिमा गायकवाड, सहायक पोलीस आयुक्त पी. डि . राठोड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकिशोर शेळके, यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि चेतन थोरबोले, पोलीस कर्मचारी यशवंत ओंबासे, रफिक नदाफ, दत्ता सोनवणे, अविनाश कोंडे, दयानंद तेलंगे, सचिन माळवे, राहुल शेडगे, पुरुषोत्तम गुणला, श्रीकांत दगडे, योगेश झेंडे, मोहन भुरूक, वामन जाधव, राजेंद्र सुर्वे, निलेश जमदाडे, हरीश गायकवाड, यांनी केली. 

 

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटकMurderखून