शहरं
Join us  
Trending Stories
1
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
2
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
3
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
4
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
5
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
6
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
7
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
8
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
9
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
10
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
11
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
12
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
13
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
14
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
15
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
16
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
17
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
18
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
19
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
20
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...

खंडणी प्रकरणात अभिनेत्री सारा श्रवणला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2019 12:09 IST

खंडणी प्रकरणात अभिनेत्री सारा श्रवणला मुंबईतून अटक करण्यात आली आहे.

पुणे - खंडणी प्रकरणात अभिनेत्री सारा श्रवणला मुंबईतून अटक करण्यात आली आहे. 'रोल नंबर १८' या चित्रपटातील अभिनेत्याविरुद्ध कटकारस्थान करून विनयभंगाची खोटी तक्रार देवून ती मागे घेण्यासाठी खंडणी उकळल्या प्रकरणात अभिनेत्री सारा श्रवणला गुन्हे शाखा यूनिट दोनने रात्री मुंबईमधून अटक केली आहे. गुन्हा गंभीर असल्यामुळे तिने दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला होता. अटकपूर्व जामीन अर्जाला फिर्यादीच्या वतीने अ‍ॅड. मिलिंद पवार आणि अ‍ॅड. अजय ताकवणे यांनी विरोध केला होता.

याप्रकरणी अभिनेता सुभाष दत्तात्रय यादव यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात रोल नंबर १८ चित्रपटाची अभिनेत्री रोहिणी मच्छिंद्र माने, दहशतवाद विरोधी पथकातील पोलिस उपनिरीक्षक अमोल विष्णू टेकाळे आणि सराईत गुन्हेगार राम भरत जगदाळे यांना यापूर्वीच अटक करण्यात आली होती. तेव्हापासून सारा श्रवण दुबईमध्ये पळून गेली होती. अभिनेत्याला खोट्या गुन्ह्यात अडकवून त्याच्याकडून ब्लॅकमेल केल्याप्रकरणी अपनिरीक्षक अमोल टेकाळे याला निलंबित करण्यात आले आहे.

हा प्रकार २८ सप्टेंबर २०१८ रोजी जगदाळे याच्या सहकारनगर येथील कार्यालयात घडला होता. रोहिणी माने व यादव यांनी 'रोल नंबर अठरा' या चित्रपटात काम केले आहे. यादव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर यादवला मिळत असलेली प्रसिद्धी माने आणि श्रवणला पाहवत नव्हती. तसेच माने ही आपल्याशी लग्न कर यासाठी यादव यांच्या मागे लागली होती. नंतर वानवडी पोलिस ठाण्यात सर्व आरोपींनी संगनमताने यादव विरुद्ध वानवडी पोलिस ठाण्याच्या वॉशरूममध्ये घुसून मानेची काढली असा आरोप करून विनयभंगाची तक्रार दाखल केली होती.

हे सर्व कटकारस्थान असल्याची तक्रार यादवने पुणे पोलिस आयुक्तांकडे केली. याची माहिती मिळताच दाखल असलेला गुन्हा मिटविण्यासाठी माने, टेकाळे व जगदाळे यांनी यादव यांना जगदाळेच्या कार्यालयात बोलावून घेतले व दाखल गुन्हा मागे घ्यायचा असल्यास सुभाषने  मानेची पाया पडून माफी मागावी व आम्ही त्याचे चित्रिकरण करू अशी अट घातली मात्र सुभाषने या गोष्टीसाठी नकार दिला. विनयभंगाचा गुन्हा खोटा असल्यामुळे माफी मागणार नाही असे सांगितले मात्र त्यानंतर 3 तास सवार्ना जीवे मारण्याच्या व तोंडावर अ‍ॅसिड फेकण्याच्या व आणखी खोटे गुन्हे दाखल करू अशा धमक्या देवून तेथे त्याला व त्याच्या नातेवाइकांना रोहिणी माने हिचे जबरदस्तीने पाय धरून माफी मागण्यास भाग पाडले. त्याचे चित्रिकरण करून १५ लाख रुपयांची मागणी केली. व पैसे न दिल्यास माफी मागतानाचा व्हिडिओ व्हायरल करू व विनयभंगाचा गुन्हा देखील मागे घेणार नाही अशी धमकी दिली. त्यापैकी १ लाख रुपये त्यांनी स्वीकारले.

ब्लॅकमेलिंगला कंटाळून यादव याने उर्वरित रक्कम न देण्याचा निर्णय घेतला. उरलेली रक्कम न दिल्याने जगदाळे, टेकाळे व रोहिणी यांनी संगनमत करून सारा श्रवण हिच्यामार्फत पाय धरून माफी मागतानाचा व्हिडिओ व अनेक खोट्या अफवा सोशल मीडियावर प्रसारित करून बदनामी केली. सारा आणि माने या दोघी मैत्रिणी आहेत. सारा दुबईत वास्तव्यास असल्याने तिला अटक करता आली नव्हती. तिचा अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर तिला अटक करण्यात आली आहे. पोलीस उपनिरीक्षक जयवंत जाधव पुढील तपास करत आहेत.

 

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीArrestअटकPoliceपोलिस