शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
2
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
3
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
4
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
5
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
6
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
7
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
8
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
9
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
10
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
11
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
12
मस्तच! नवरात्रीत कन्या पूजनानंतर द्या 'हे' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकलींचे चेहरे
13
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
14
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
15
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!
16
समृद्धी महामार्गावर खरंच खिळे ठोकण्यात आले? MSRDC ने अखेर दिलं स्पष्टीकरण
17
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
18
३० हजार ते ३० लाखांपर्यंत फायदा; जीएसटी कपातीचा कार खरेदीदारांना मोठा लाभ, कोणती गाडी किती स्वस्त?
19
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
20
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी

Dr.Veena Dev Passed Away: लेखिका, समीक्षक डॉ. वीणा देव यांचे निधन

By श्रीकिशन काळे | Updated: October 29, 2024 18:18 IST

डॉ वीणा देव या लेखिका, समीक्षक असून त्यांना अनेक साहित्य पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते

पुणे : लेखिका, समीक्षक डॉ. वीणा देव (वय ७६) यांचे आज निधन झाले. त्या प्रसिध्द साहित्यिक गो. नी. दांडेकर यांच्या कन्या होत, तर अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांच्या मातोश्री होत. त्या काही दिवसांपासून आजारी होत्या. त्यांची आज प्राणज्योत मालवली. पुण्यातील शाहू मंदिर महाविद्यालयात त्या मराठी विभागप्रमुख होत्या. तेथे त्यांनी ३२ वर्षे अध्यापनाचे कार्य केले. ‘मराठी कथा-कादंबऱ्यांची नाट्यरूपे’ या विषयावर सादर केलेल्या प्रबंधासाठी त्यांना पीएच.डी. ही पदवी मिळाली होती. लेखन, संकलन आणि संपादन हे साहित्याचे विविध प्रकार त्यांनी लीलया हाताळले. या संदर्भातील त्यांची अनेक पुस्तके प्रसिध्द आहेत. त्यांनी गो. नी. दांडेकर यांच्यावर लिहिलेल्या ‘आशक मस्त फकीर’ या व्यक्तीचित्रास महाराष्ट्र शासनातर्फे उत्कृष्ट ललित साहित्य निर्मितीचा पुरस्कार मिळाला. तसेच महाराष्ट्र शासनाच्या मराठी राजभाषा सल्लागार समितीच्या त्या माजी सदस्य होत्या. त्यांना ‘मोरया गोसावी जीवनगौरव’ तसेच साईरंग प्रतिष्ठानतर्फे कर्तृत्वगौरव पुरस्कार मिळाला होता. डॉ. वीणा देव ठाणे जिल्हा आणि विटा येथील ग्रामीण साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा होत्या. साहित्य आणि कला क्षेत्रात विविध विषयांवर अनेक ठिकाणी त्यांनी व्याख्याने दिली होती. मुलाखती घेणे, सूत्रसंचालन करणे याद्वारे त्यांचा आकाशवाणी, दुरदर्शनवर सहभाग असायचा.

१९७५ पासून गो. नी. दांडेकर लिखित विविध कादंबऱ्यांच्या अभिवाचनाचे ६५० हून अधिक कार्यक्रम त्यांनी केले आहेत. तसेच गो. नी. दा. यांच्या स्मरण-जागरणासाठी त्यांचे पती विजय देव यांच्या मदतीने त्या मृण्मयी पुरस्कार, दुर्ग साहित्य संमेलन, गो. नी. दा. यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन अशांसारखे उपक्रम राबवित. मृण्मयी प्रकाशनातर्फे त्यांनी गो. नी. दा. यांच्या दुर्मिळ साहित्यकृती प्रकाशित केल्या.

टॅग्स :PuneपुणेMrinal Kulkarniमृणाल कुलकर्णीVeena Devवीणा देवcinemaसिनेमाartकलाDeathमृत्यूcultureसांस्कृतिकEducationशिक्षण