शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंचा भुजबळांवर हल्लाबोल; मुख्यमंत्र्यांनी बाजू सावरली, म्हणाले...
2
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
3
"अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
4
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
5
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
6
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
7
रिपाईला एकही जागा मिळाली नाही, पण मला कॅबिनेट मिळणार - रामदास आठवले
8
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
9
Uddhav Thackeray : "भाजपा RSS लाही नकली संघ म्हणू शकतो; बंदीही घालू शकतो, 100 वे वर्ष धोक्याचे"
10
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
11
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
12
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
13
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
14
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
15
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका
16
मंगळाचा रुचक राजयोग: ५ राशींना मंगलमय काळ, अधिक कमाईची संधी; उत्तम यश, प्रगती योग!
17
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
18
Rakhi Sawant : "मला खूप मजा करायचीय, माझ्यासाठी प्रार्थना करा..."; राखी सावंतचा सर्जरी आधीचा Video व्हायरल
19
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे
20
Gratuity Rules : खासगी नोकरीमध्ये ग्रॅच्युइटी मिळते का, त्याची गणना कशी होते माहितीये?

बारामतीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी खोत यांचा पुतळा जाळला

By ऑनलाइन लोकमत | Published: August 02, 2020 12:46 AM

सदाभाऊ खोत यांना महाराष्ट्रात फिरू न देण्याचा इशारा..

ठळक मुद्देदूध आंदोलनावरून राजू शेट्टी व सदाभाऊ खोत आमने सामने

बारामती: स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आणि माजी मंत्री सदाभाऊ खोत या एकेकाळच्या सहकाऱ्यांमध्ये जुंपली आहे. राजू शेट्टी आता काजू शेट्टी झाला आहे. मंत्रिपद न मिळाल्यानं हा भंपक माणूस भ्रमिष्ट झाल्याची जहरी टीका खोत यांनी केली आहे.प्रत्येक गावात देवाच्या नावानं एक वळू-रेडा सोडलेला असतो. तसा हा रेडा आहे. त्याला शेतकऱ्यांनी सोडून दिलंय. हा रेडा आता दिसेल त्या पिकात तोंड घालू लागला आहे, अशा शब्दांमध्ये खोत यांनी शेट्टींवर घणाघाती टीका केली. त्या टीकेचे तीव्र पडसाद बारामतीत शनिवारी दुपारी उमटले. स्ववाभिमानी शेतकरी संघटनेेच्या कार्यकर्त्यांनी सदाभाऊ खोत यांचा पुतळा जाळला.

तसेच खोत यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारत त्यांच्या निषेधार्थ घोषणा देण्यात आल्या.त्यानंतर स्वाभिमानीं शेतकरी संघटनेच्या विजय असो,एकच गट्टी राजु शेट्टी अशा घोषणा देत स्वाभिमानीचे कार्यकर्ते निघुन गेले.

सदाभाऊ खोत यांच्या टीकेवर पलटवार करताना राजू शेट्टी म्हणाले, दूध दरवाढीसाठी केलेल्या आंदोलनात शेतकरीच न दिसल्यानं खोत हे भ्रमिष्ट झालेे आहे. 

खासदार शेट्टी यांच्या केवळ प्रकाशझोतात येण्यासाठी खोत टीका करतात. यापुढे खोत यांना महाराष्ट्रात फिरु देणार नसल्याचा इशारा स्वाभिमानीचे युवक प्रदेशाध्यक्ष अमर कदम यांनी दिला.यावेळी कदम यांच्यासह अक्षय खंडाळे,पांडुरंग सोनवणे,गणपत कदम,विशाल काळे, दत्तात्रय जेलकर,नाथा चव्हाण आदी उपस्थित होेते.—————————————

टॅग्स :BaramatiबारामतीSadabhau Khotसदाभाउ खोत Raju Shettyराजू शेट्टीSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटना